गोव्यातूनही केला ‘त्या’ निपाह रुग्णाने प्रवास!

यंत्रणा मात्र अनभिज्ञ : रुग्णाच्या नातेवाईकांनी कर्नाटक प्रशासनाला दिली माहिती
Nipah virus
Nipah virusDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केरळमध्ये (Kerala) बारा वर्षाय मुलाचा निपाह व्हायरसमुळे (Nipah virus) मृत्यू झाला असतानाच मंगळुरूमध्ये (Mangalore) सापडलेल्या निपाह संक्रमित रुग्णाने गोव्यातूनही (Goa) प्रवास केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

राज्यात सध्या तरी कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे मानले जाते. गणेशोत्सवानंतर यावर अधिक प्रकाश पडेल. असे असतानाच मंगळुरूमध्ये सापडलेल्या निपाह रुग्णाने गोव्यातून प्रवास केला असून तो गोव्यात वास्तव्यास होता, अशी माहिती या रुग्णाच्या नातेवाईकांनीच कर्नाटक प्रशासनाला दिली आहे. याबाबत आरोग्य प्रशासनाला अद्याप काही माहिती नाही. मात्र आरोग्य प्रशासनाने कर्नाटक आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णाची तपशीलवार माहिती घेण्यात येत असल्याचे विभागाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. दुसरीकडे, आरोग्य विभाग सतर्क झाला असून बॉर्डरवर तपासणी कडक केली जात आहे.

Nipah virus
Goa Tourist: गोव्याची दारे खुली न झाल्याने रशियन पर्यटक इजिप्तकडे वळण्याची भीती

मंगळवारी दोन बळी; संख्या वाढली

गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दगावले. राज्यात आता बळींची एकूण संख्या 3 हजार 219 एवढी झाली आहे. शनिवारी 6 हजार 212 चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून 109 कोरोनाबाधित आढळून आले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 717 एवढी आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मडगाव येथे असून पणजी, काणकोण, चिंबल आणि शिवोली येथेही आहेत.

Nipah virus
Goa Murder Case: पिडीतेला बुडवूनच मारल्याची शक्यता

पत्रादेवीवर कडक तपासणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर तपासणीबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रादेवी, दोडामार्ग या मार्गावर तपास अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक प्रवाशाच्या कोरोना अहवालाची पडताळणी करून बस नंबरसह नोंद करण्याची सक्ती केली आहे. ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या चाचणीचा अहवाल नाही, त्यांची बॉर्डरवर नव्याने चाचणीची सूचना देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com