Goa Monsoon Update: Rose Cyclone is gone, now Shaheen Cyclone will come Twitter/@IMDGOa
गोवा

Goa Monsoon Updates: ‘गुलाब’ गेले आता ‘शाहीन’ची चाहूल

‘गुलाब’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली

दैनिक गोमन्तक

पणजी: काही दिवसापुर्वी बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या ‘गुलाब’ (Gulab Cyclone) चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी झाली आहे. पण, आज बुधवारीही गोवा (Goa) राज्यात पावसाची शक्यता कायम असणार आहे. कारण येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा ‘शाहीन’ वादळाची निर्मिती होण्याची शक्यता राज्य हवामान खात्याने वर्तविली आहे.

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हे वादळ गुजरात किनारपट्टीवर जावून नष्ट होईल. पण, त्याचवेळी ‘शाहीन’ (Cyclone shaheen) या नव्या वादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हे वादळ पुढे पाकिस्तान, सौदी अरेबियाच्या दिशेने जाईल. त्यामुळे त्याचा भारताला कोणताही धोका नसणार, असे गोवा हवामान खात्याचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी सांगितले.

‘गुलाब’ चक्रीवादळाचा राज्यावरील प्रभाव आज दिवसभर कायम राहील. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार पावसासह ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनाही खोल समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती आहे, राहुल एम. यांनी दिली.

दरम्यान, यावर्षीचा मान्सून हंगाम संपण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.1 जून ते 28 सप्टेंबर या कालावधीत राज्यात 121.85 इंच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाच टक्के अधिक झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत राज्यात 116.46 इंच पावसाची नोंद झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT