Goa Monsoon Orange Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात मुसळधार पाऊस सुरूच! IMD तर्फे ऑरेंज अलर्ट जारी

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Kavya Powar

Goa Monsoon Update: राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज (गुरुवारी) वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज 28 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, 29 ते 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरलाही जोरदार पावसाची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर अति मुसळधार पावसाची चेतावणी जारी करताना IMD ने म्हटले आहे की, 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. ही एकंदरीत परिस्थिती पाहता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याच्या अनेक भागात दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. पेडणेत गेल्या 24 तासांत सर्वाधिक 78.8 मिमी पाऊस झाला असून म्हापसामध्ये 78.5 मिमी पाऊस झाला आहे.

मुसळधार पावसामुळे राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मार्केटमध्ये Motorola चा मोठा धमाका! 200MP कॅमेऱ्यासह येतोय दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोन, टीझरने वेधलं सर्वांचं लक्ष

खरी कुजबुज: साहेबांची राजकीय उंबरठ्यावर धाव!

Goa House Regularization: गोव्यात 2014 पूर्वीच्या घरांच्या नियमितीकरणाला मोठी मुदतवाढ; अर्जासाठी 6 महिन्यांऐवजी आता मिळणार 18 महिने

UPI Charges: ना टॅक्स, ना सेस... युपीआय पेमेंट्सबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; ग्राहकांच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही VIDEO

Crime News: धक्कादायक! रात्रीच्या वेळी जोडप्याला घेरलं, नंतर 7 जणांनी तरुणीसोबत...; व्हिडिओ व्हायरल होताच 3 आरोपींना बेड्या VIDEO

SCROLL FOR NEXT