Sudesh Bhosle Meet Minister Subhash Shirodkar
Sudesh Bhosle Meet Minister Subhash ShirodkarDainik Gomantak

सुप्रसिध्द पार्श्वगायक सुदेश भोसले गणेशोत्सवासाठी मूळगावी! मंत्री शिरोडकरांची घेतली भेट

मुंबई येथील सुप्रसिध्द पार्श्वगायक तथा मिमिक्रीकार सुदेश भोसले हे गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त आपल्या मुळगावी शिरोड्याला आले.
Published on

मुंबई येथील सुप्रसिध्द पार्श्वगायक तथा मिमिक्रीकार सुदेश भोसले हे गणेशचतुर्थी उत्सवानिमित्त आपल्या मुळगावी शिरोड्याला आले. त्यांनी सार्वजनिक गणपतींचे तसेच अनेक मित्रपरिवारांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.

Sudesh Bhosle Meet Minister Subhash Shirodkar
Goa Tiger Reserve: न्यायालयाने निकाल दिला! तरीही मुख्यमंत्री म्हणतात, ''अजून व्याघ्र प्रकल्पावर अभ्यास करायचाय!''

गोव्याच्या भूमीने अनेक महान कलाकार रंगभूमीला, सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुदेश भोसले ते दरवर्षी गणपतीसाठी आपल्या मूळगावी येतात.

दारम्यान, मंगळवार दि. २६ रोजी सुदेश भोसले यांनी शिवशैल शिरोडा येथे राहणारे शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा जलस्‍त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

मंत्री शिरोडकर यांनी भोसले यांचे स्वागत केले. यावेळी शिरोडकर यांच्या कुटुंबीयांनीही पार्श्वगायक भोसले यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com