Goa Monsoon Update
Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: गोवा गारठला, पावसाची सर्वाधीक नोंद

दैनिक गोमन्तक

पणजी: यंदाच्या हंगामातील सर्वाधिक नोंद करीत पावसाने सोमवारी सरासरी गाठली. गेला आठवडाभर पाऊस सरासरीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घसरला होता. यापूर्वी 15 जून रोजी 120.8 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. काल दिवसभरात 130.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. (Goa Monsoon Update highest rainfall recorded in Goa)

राज्यात सर्वच तालुक्यांना आज पावसाने झोडपून काढले. हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्यरात्री राज्यात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. शिवाय सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर काही काळ पावसाने उसंत दिली, पण रीपरीप कायम होती. सोमवारी राज्यात सर्वाधिक 130.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या हंगामात २२ सप्टेंबर रोजी 137.3 मि.मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती, तर यंदाच्या हंगामात 15 जून रोजी 120.8 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली होती.

16 जुलैपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा 15 टक्क्यांनी अधिक होता. गेला आठवडाभर पावसाचा जोर ओसरल्यामुळे सरासरी 11 टक्क्यांनी घटली होती. आता पुन्हा जोर वाढल्याने पावसाने सोमवारी सरासरी गाठली. राज्याची 12 जुलैपर्यंतची सरासरी 1303.9 इतकी आहे, तर आतापर्यंत 1289.9 मि.मी. इतकी नोंद झाली आहे. 15 जुलैपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

राज्य गारठले

गेले काही दिवस राज्यात पारा वाढला होता. रविवारी (ता. ११) मध्यरात्रीपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. तापमान ३२ अंश सेल्सियसवरून 28 वर आले असल्याने गारठा निर्माण झाला आहे. याकाळात सर्दी आणि पडशाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्याने शेतकामांनाही वेग आला आहे. गोव्यातील एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावाजले जाणारे साळावली धरण सोमवारी काठोकाठ भरले असून 42 मीटर उंचीवरून फेसाळत कोसळणारे पाणी पाहण्याचा सर्वोच्च आनंदाचा क्षण आता केव्हाही निर्माण होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT