फातोर्डा - रेव्ह्युल्यूशनरी गोवन्स (Revolutionary Goans) संस्थेच्या अंदाजे 35 सदस्यांनी कोलवा समुद्र किनारा (Colva Beach) परिसरात 200 पेक्षा जास्त फुलांच्या रोपटांची (Flowering plant) लागवड केली. हिरवागार गोवा उपक्रमाअंतर्गत ही लागवड करण्यात आली. शिवाय स्थानिकांना या संस्थेतर्फे वैद्यकीय उपयोगी व फळांची सुमारे 50 रोपटीं देण्यात आली.(Planting of 200 flowering plants in Colva beach area)
हवामानातील (weather) बदलाचे आव्हान पेलण्यासाठी तसेच व गोवा प्रदुषणमुक्त (Pollination) करण्याची संकल्पना बाळगुन रेव्ह्युल्यूशनरी गोवन्स या संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण. जलसंधारण, सौर उर्जा निर्मिती व कचरा व्यवस्थापन ही कामे हातात घेतली जातील.
दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या दुपदरीपणाच्या नावावर सरकार पर्यावरणाचा इबाड करीत आहे असे रेव्ह्युल्युशनरी गोवाचे सालसेत तालुका निमंत्रक सेबी फर्नांडीस यांनी सांगितले.
रेव्ह्युल्युशनरी गोवा सरकार गोव्यातील जमिनी व पर्यावरणाचा इबाड खपवून घेणार नाही. गोवा स्वच्छ व हिरवेगार ठेवण्यासाठी आमची संस्था सर्वतोपरी प्रयत्न करील असेही फर्नांडीस यानी सांगितले. या संस्थेच्या सदस्यांनी बाणावली परिसरातच 1000 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली आहे. आमच्या या उपक्रमाला लोकांचे सहकार्य लाभत असल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.