Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पुढील चार तासात अतिवृष्टीचा इशारा

गोवा राज्यात पावसाचा (Monsoon) जोर कायम, पाऊस सरासरीपेक्षा आठ टक्क्यांनी वाढला

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) पावसाचा (Rain) जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातल्या बहुतेक तालुक्याना पावसाने झोडपून काढल्यामुळे पूरसदृश्य स्थिती आहे. दरम्यान, राज्यात पावसाने सरासरी ओलांडली असून आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात तब्बल 9 टक्क्यांनी पावसाची सरासरी घसरली होती. पणजी शहरासह इतर भागात पुढील चार तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Goa Monsoon Update: Heavy rain forecast in Goa for next four hours)

मागील 24 तासात राज्यात 117.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढताच असल्यामुळे म्हादईसह राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्याशिवाय शहरीभागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. सकाळी हवामान वेधशाळेने जारी केलेल्या सूचनेनुसार पुढील कांही तासात मुसळधार पावसाच्या शक्यतेबरोबरच पूरसदृश स्थिती निर्माण होणार आहे. घरे, झाडे कोसळण्याच्या घटना घडणार असून घाटात दरडी कोसळण्याच्या घटनांची शक्यता असल्याने प्रवाशांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या अतिवृष्टीमुळे पणजी शहराची तुंबई झाली असून वाहतुकीला होत असलेल्या कोंडीमुळे नागरीक हैराण आहेत. गेल्या 24 तासात जुने गोवा (120.5 मि.मी.), पेडणे (111.0मि.मी) आणि काणकोण (105.0 मि.मी) भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरीकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT