Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: पावसामुळे जनजीवन विस्कळीत! एकीकडे धरण ओव्हरफ्लो तर दुसरीकडे पडझडीच्या घटना सुरूच; वाचा सविस्तर वृत्त

पाऊस उसंत घेतच नसल्याने पडझडीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Kavya Powar

Goa Monsoon Update 2023: राज्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाऊस उसंत घेतच नसल्याने पडझडीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

घरांवर, वाहनांवर झाडे कोसळत असल्याने नागरिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहेत. मध्यरात्रीपासून राज्यात अशाच घटना घडल्या आहेत.

शेल्डे येथे भूस्खलन

मुसळधार पावसामुळे शेल्डे येथे भूस्खलनाची घटना घडली आहे. शेल्डे- कुडचडे येथील एका घराजवळ भूस्खलनामुळे पाणी आणि मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आला आणि संपूर्ण घरात भरल्याची माहिती समोर आली आहे.

सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

चिखलीत रस्त्यावर कोसळले झाड

पाऊस सुरू झाल्यापासून झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा धोका वाढला आहे. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

चिखली येथील रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे काही काळ वाहतूक थांबली होती. दरम्यान, याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी झाड रस्तीवरून हटवण्यास सुरुवात केली.

झाड कोसळण्याच्या सुमारास कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने यामध्ये जीवितहानी झाली नाही

अंजुणे धरणातून विसर्ग सुरू

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे राज्यातील धरणे ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्येच अंजुणे धरण भरले असून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 11.15 मी. पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून चारही दरवाजे उघडले आहेत.

दरम्यान, यामुळे वाळवंटी आणि साखळी नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Anjunem Dam Overflow

धुव्वाधार पावसामुळे बार्देशमध्ये जनजीवन विस्कळीत

मागील काही दिवसात राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागालाही पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये बार्देश तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घडल्या आहेत. झाडे उन्मळून घरांवर पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. थिवी, साळगाव तसेच नेरूलमध्येही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT