Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: निसर्गाचे रौद्ररुप; सांगेत पावसाचा तडाखा!

Goa Rain: सांगेत परतीच्या पावसाने व्हालसेभाटी येथे प्रचंड प्रमाणात कहर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Rain: सांगेत परतीच्या पावसाने व्हालसेभाटी येथे प्रचंड प्रमाणात कहर केला. मुख्य रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने शुक्रवारी संध्याकाळी दोन तास वाहतूक खोळंबली, तर बागायती, ऊसशेतीमध्ये पाणी शिरले. एकूणच निसर्गाचा रौद्रवतार प्रथमच पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गुरुवारी संध्याकाळी गडगडाटासह चार तास पाऊस पडल्यामुळे व्हालसे नदीतील पाणी अचानक वाढू लागले. पावसाच्या हंगामातही इतके पाणी कधी पाहिले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

नदीच्या काठावर बागायत असलेल्या बाबू वेळीप यांना या निसर्ग प्रकोपाचा फटका सहन करावा लागला. येथील आंब्याचा मोठा वृक्ष उन्मळून प्रवाहासोबत वाहत पुलाच्या कमानीत अडकून पडला. तसेच पाण्याच्या प्रवाहासह रस्त्याकडेचा मातीचा भराव वाहून गेला.

पावसाळ्यातही इतका पूर नव्हता

भाटीचे चंद्रकांत गावकर, पोरो गावकर म्हणाले की, पावसाळ्यात सतत पाऊस पडूनही नदीला इतका पूर कधीच आला नव्हता. एक प्रकारे ढगफुटीच झाल्याचा अनुभव आला. कर्नाटकाच्या शिगोणे नदीतून पाण्याचे लोट वाहून येत होते. यापूर्वी काणकोण, नेत्रावळीत ढगफुटीमुळे आलेल्या पुराची आठवण आली.

सरकारी यंत्रणा आली, तशी परतली

पुलाखाली अडकलेला आम्रवृक्ष काढण्यासाठी साबांने जेसीबी यंत्र पाठविले होते. पण वृक्षाचा आकार पाहता चार यंत्रे लावली तरी ते नदीपात्रातून हटविणे शक्य नसल्याने जेसीबी परतले. अग्निशमन दलानेही प्रयत्न करून पाहिला. पण त्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळे अग्निशमन दलालाही परतावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT