Goa Rain Damage Dainik Gomantak
गोवा

Goa Dain Damage: हॉटेलचे छप्पर कोसळले, 3 घरांची मोडतोड; गोव्यात पावसामुळे नुकसानीचे सत्र सुरूच

Goa Monsoon: संततधार पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे माड व अन्य झाडांची पडझड झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एक माड वीजतारांवर लटकल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

Sameer Panditrao

Goa Rain Damage: रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलवजा क्लबला कसल्याच प्रकारची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत असते. या क्लबचे हंगामी स्वरूपाचे छप्पर कोसळल्यानंतर हॉटेलचे मालक व संबंधितांनी कसल्याच प्रकारची हालचाल केली नाही. शेवटी स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर सायंकाळी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व वीज विभागाचे कर्मचारी यांनी धावपळ करून दोन तासांच्या नंतर वीजवाहिन्यांवर लोंबकळत असलेले छप्पर दूर केले.

हरमलात माड पडून वीजतारांचे नुकसान

खालचावाडा भागात संततधार पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे माड व अन्य झाडांची पडझड झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एक माड वीजतारांवर लटकल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तो माड हटविला. खालचावाडा येथील प्रकाश साटेलकर यांच्या घरानजीकचा माड रविवारी (ता.१५) सायंकाळी ७ वा.च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने वीजतारांवर उन्मळून पडला.

सुदैवाने तो वीजतारांवर लटकल्याने दुकानावर तसेच घराच्या छपरावर पडला नाही आणि जीवितहानी टाळली. त्यावेळेस वाहतूक फार कमी होती. वीज कर्मचाऱ्यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित करून अन्य भागात पुरवठा सुरळीत केला.

बामणभाटी-भाटलेत वड पडून गेटचे नुकसान

बामणभाटी-भाटले रस्त्यावरील जीर्ण वडाचे झाड लोखंडी गेटवर कोसळून अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी हा रस्ता मोकळा केला. रविवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास माजी सरपंच प्रदीप नाईक यांच्या गेटबाहेर असलेले वडाचे झाड पूर्णतः गेटवर कोसळले तसेच दोन स्कूटर झाडाखाली अडकल्याने स्कूटरचे अंदाजे ४० हजारांचे नुकसान झाले.

या घटनेत वीजपुरवठा खंडित झाला व वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी जयराम शेटगावकर, जवान राजेश परब, मयूर नाईक, आशीर्वाद नाईक व रजत नाईक आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून परिश्रम घेत त्या वाड्यावरील वीजपुरवठा सुरळीत केला. या भागात अनेक जीर्ण झाडे असून पावसाळ्यात तसेच वादळामुळे कोसळू शकतात, असे नागरिकांनी सांगितले.

डिचोलीत पावसामुळे तीन घरांची मोडतोड

गेल्या तीन-चार दिवसांपासून दमदारपणे सक्रिय झालेल्या पावसाने आज (सोमवारी) डिचोलीतील विविध भागांत तडाखा दिला. आज पहाटेपासून तीन घरांवर मिळून नऊ ठिकाणी झाडांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, अन्य कोणताच अनर्थ घडला नसल्याची माहिती मिळाली आहे.

शांतादुर्गानगर-बोर्डे येथे एका घरावर फणसाचे झाड कोसळून ६० हजार रुपयांची हानी झाली. तर शिरगाव येथे एका घरावर झाड कोसळून २० हजार रुपयांची हानी झाली. अन्य एका घटनेत खाजनवाडा-पाळी येथील एका घरावर झाड पडून घराची काही प्रमाणात मोडतोड झाली. याशिवाय शिवलकरवाडा-मुळगाव येथे झाड कोसळून एका घराच्या कुंपणाची मोडतोड झाली.

मडगाव परिसरात पडझडीच्या घटना

दवर्ली येथे मारुती मंदिरजवळ एका शेडवर भले मोठे झाड पडून ८० हजारांचे नुकसान झाले. दोन कारवरही हे झाड पडले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन एक लाखाची मालमत्ता वाचवली. दरम्यान, मालभाट येथे घुमटीवर झाड पडले, तर माझीलवाडा-बाणावली येथे एका मंदिरावर झाड पडण्याची घटना घडली. तर आके येथे एका संरक्षक भिंतीवर फणसाचे झाड पडल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: थातोड- धारबांदोडा येथे अज्ञात वाहच्या धडकेत दोन म्हशी दगावल्या

Sanquelim: साखळी पालिका स्वच्छतेत अव्वल! 12 प्रभागांत राबविले विविध उपक्रम; दिल्लीत होणार पुरस्कार प्रदान

Goa School Problems: गोव्यातील 20% शाळांत एकच शौचालय, 13% विद्यार्थ्यांना वाटते असुरक्षित; सर्व्हेक्षणातून धक्कादायक माहिती उघड

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

SCROLL FOR NEXT