heavy rain Goa June 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात मान्सूनचा 'धमाका'! एका दिवसात 103.8 मि.मी. पावसाची नोंद; 16 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Goa Monsoon Updates: राज्यात या मान्सून हंगामातील महिन्यातील सर्वाधिक १०३.८ मि.मी. एका दिवसातील पावसाची नोंद झाली

Akshata Chhatre

पणजी: महाराष्ट्रासह गोव्यात देखील मान्सूनने आता खऱ्या अर्थाने जोर पकडला आहे. शुक्रवारी (१३ जून) राज्यात या मान्सून हंगामातील महिन्यातील सर्वाधिक १०३.८ मि.मी. एका दिवसातील पावसाची नोंद झाली आहे, यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

'ऑरेंज' अलर्ट आणि पुढील तीन दिवसांचा अंदाज

भारतीय हवामान विभाग (IMD) गोवा राज्यासाठी १६ जूनपर्यंत 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे, तर काही निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

१६ जूननंतर पुढील तीन दिवसांसाठी हा अलर्ट 'यलो' अलर्टमध्ये बदलेल, याचा अर्थ काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता बाळगली जाऊ शकते.

आतापर्यंतचा मान्सून आणि तापमानाची स्थिती

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या महिन्यात मान्सूनची सक्रियता आतापर्यंत कमी होती. २८८.४ मि.मी. पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २४२.४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही तफावत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसामुळे राज्यातील तापमानात घट झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शुक्रवारी गोव्यात कमाल तापमान २७°C आणि किमान तापमान २४°C नोंदवले गेले. पुढील २४ ते ४८ तासांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT