Goa Monsoon Alert: Yellow Warning  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात मान्सूनची चाहूल! 17 मे पर्यंत 'यलो अलर्ट'; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा

Goa rain forecast IMD alert: गोवा आणि कोकण किनारपट्टी भागात १७ मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पणजी: हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मान्सूनने बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये दाखल व्हायला सुरुवात केल्याने गोव्यात १७ मे पर्यंत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गोवा आणि कोकण किनारपट्टी भागात १७ मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या महितीनुसार मंगळवारी (दि.१३) बंगालच्या उपसागराचा काही दक्षिणेकडील भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये प्रवेश केला असल्याने गोव्यात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.

१३ ते १७ मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे विजांचा कडकडाट आणि ३०-५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत गोव्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळाला, यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांच्या वेळी झाडांखाली किंवा असुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे टाळावे, तसेच वीज चमकत असताना खुल्या मैदानात थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. १७ मे पर्यंत गोव्यात पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

SCROLL FOR NEXT