Goa Monsoon 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्याला पावसाने झोडपले; आतापर्यंत 70 इंच बरसला...

पडझड सुरूच; नद्यांच्या पातळीत वाढ

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे गोव्यासहित महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलगंणा राज्यात अतिवृष्टीसहीत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याद्वारे राज्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज राज्यभर सकाळपासून दमदार पाऊस सुरू असून काही भागात झाडांची पडझड तसेच इतर काही दुर्घटनांची नोंद झाली आहे.

सायपे येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूकासाठी रस्ता बंद झाला असून झाड हटवण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन दिवस राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावे तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

मागील 24 तासांत राज्यात एकूण 86.9 मिमी. (3.38 इंच) पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण 70 इंच पावसाची बरसात झाली आहे.

मागील 24 तासांत सर्वाधिक 196.7 मिमी. म्हणजेच तब्बल 7.74 इंच एवढ्या पावसाची उच्चांकी नोंद वाळपई येथे झाली असून यंदाच्या मॉन्सूनमध्ये एका ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडण्याचा हा उच्चांकी आकडा आहे.

वाळवंटीच्या पातळीत वाढ; मात्र स्थिती नियंत्रणात

साखळीतील वळवंटी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने बाजारात वाळवंटीच्या किनारी असलेल्या पूरप्रतिबंधक यंत्रणेचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पंपिंग सुरू करून बाजारातील नाल्यात साचणारे पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

सकाळपर्यंत सदर पंपिंग सुरूच होते. त्यानंतर पाण्याची पातळी किंचित ओसरल्याने पंप बंद करण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रभर जोरदार पडलेल्या पावसामुळे वाळवंटी नदीची पातळी रात्री वाढली होती.

बाजारातील नाल्याची पातळी 3.40 मीटर, तर नदीची पातळी 3.50 मीटर झाल्यानंतर नाल्याचे गेटस् बंद करण्यात आले. दिवसभर पुन्हा पातळी न वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

पणजीत रस्त्यावर पाणी

राजधानी पणजी सकाळपासून उसंत न घेता पावसाची रिपरिप सुरू असल्याने पणजी स्मार्ट सिटीत सखल भागात पाणी तुंबले असून पणजीतील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

एटीन्थ जून रस्ता, पणजी बसस्थानक, सांतिनेज, परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले. पावसाच्या पाण्याला प्रवाहित होण्यासाठी वाट नसल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT