Mopa Airport इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी दिलीय. इंडिगो एअरलाईन्सतर्फे गोवा ते अबुधाबी अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबी (संयुक्त अरब अमिराती - UAE) पर्यंत हे थेट उड्डाण असेल. ही विमानसेवा 2 सप्टेंबरपासून सुरु होणार असून कंपनीने तिकीटदर देखील जाहीर केले आहेत.
तिकीट दर 20 हजार पासून सुरु असून प्रवाशांना थेट गोवा ते अबुधाबी पर्यंत प्रवास करता येणार आहे. 2 सप्टेंबरला रात्री 12 वाजता सुटणाऱ्या विमानाचा तिकीट दर 20, 232 एवढा असून हे विमान 2. 15 अबुधाबीला पोहोचेल.
तसेच 4 आणि 7 सप्टेंबरला देखील याच वेळेत ही फ्लाईट सुटणार आहे. दरम्यान या विमानसेवेमुळे गोमंतकीयांसोबतच लगतच्या राज्यातील प्रवाशांना सुद्धा याचा फायदा होणार असून साहजिकच गोवा सरकारच्या तिजोरीत भर पडणार आहे.
याअगोदर इंडिगो एअरलाईन्सतर्फे मोपा विमानतळावरून अमृतसर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, गुवाहाटी, रांची, राजकोट, विशाखापट्टणम आणि लखनौ या ठिकाणी आपली सेवा सुरू केली आहे. याशिवाय विस्तारा विमान कंपनीनेही लखनौ-गोवा जोडले आहे.
‘इंडिगो’कडून मोपा विमानतळावरून आठवड्याला 168 उड्डाणे होत असून देशांतर्गत 8 स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.
गोवा हे पर्यटकांचे आवडते स्थळ असल्यामुळे इंडिगोकडून सुरु झालेल्या या सेवेमुळे आता प्रवाशांना नवीन पर्याय उपलब्ध होऊन प्रवासही अधिक परवडणारा आणि उत्तर गोव्याच्या प्रगतीसाठी परिणामकारक ठरू शकणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.