Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात रविवारी कुठे किती पावसाची नोंद? येत्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा वाचा सविस्तर

पुढील चार दिवासांत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून, दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभरात राज्यात सर्वत्र जोरदार सरी कोसळल्या, दक्षिण गोव्यातील केपे आणि सांगे तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला तर, पणजी आणि म्हापसा येथे तुलनेने कमी पावसाची नोंद झाली आहे.

पुढील चार दिवासांत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यात 06 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने वर्तवला आहे.

आज दिवसभरात कुठे किती पडला पाऊस?

केपे 12 सेमी आणि सांगे तालुक्यात 10 सेमी पावसाची नोंद झाली आहे. तर, फोंडा आणि साखळी 06 सेमी, मुरगाव, काणकोण, ओल्ड गोवा आणि मडगाव 05 सेमी, पेडणे, दाबोळी आणि म्हापसा येथे 04 सेमी आणि पणजीत 03 सेमी पावासाची नोंद झाली आहे.

गोवा वेधशाळेने सांयकाळी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. उत्तर व दक्षिण गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टी लगत 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी झाडांची पडझड होण्यासह विविध घटना समोर येत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पावसाळी पर्यटनाला प्रतिसाद

राज्यात मुसळधार पावसामुळे पावासाळी पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT