G20 च्या भेटवस्तूंमध्ये कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन? मिरांडा कुटुंबीय गोवा सरकार विरोधात ठोकणार दावा

कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोवा राज्य सरकार विरोधात दावा ठोकणार असल्याचा इशारा मिरांडा यांच्या मुलांनी दिला आहे.
G20 Meeting In Goa Mario de Miranda
G20 Meeting In Goa Mario de MirandaDainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत मारियो डी मिरांडा यांच्या कॉपीराइट कलाकृती परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोवा राज्य सरकार विरोधात दावा ठोकणार असल्याचा इशारा मिरांडा यांच्या मुलांनी दिला आहे.

गोव्यात आयोजित G20 बैठकांमधील सहभागी व्हीआयपींना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये मिरांडा यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. तसेच, स्थापन केलेला फायबरग्लास पुतळ्याचा वापर मिरांडा यांच्या कलाकृतीचा गैरवापर असून, कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन आहे. असे मिरांडा यांची मुले रिशाद आणि राऊल यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमच्या दिवंगत वडिलांची कलाकृती कोणत्याही परवानगीशिवाय वापरली जात असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. भारत आणि गोवा विकसित होत आहे असे दाखवून G20 देशांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, दुसरीकडे आमच्या वडिलांच्या कलाकृती परवानगीशिवाय वापरून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. असे त्यांच्या मुलांनी हिदुस्थान टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

G20 बैठकांच्या आयोजकांनी मारियो यांच्या कलाकृतींचा वापर करण्यासाठी परवानगी घ्यावी अशी विनंती केलीय.

G20 Meeting In Goa Mario de Miranda
Goa Panchyat Byelection : 3 तालुक्यातील 3 पंचायतींसाठी चुरशीची लढत! 2 वाजेपर्यंतची आकडेवारी आली समोर

G20 आयोजकांनी मारियो गॅलरीकडून कलाकृतींचा वापर करण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी आवाहन करतो. उल्लंघन करणार्‍यांना कायद्यानुसार न्यायालयात खेचण्याचा अधिकार आम्ही मारिओ गॅलरीला दिला आहे. असे त्यांच्या मुलांनी पत्रात म्हटले आहे.

G20 मधील सहभागी व्हीआयपींना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये मारिओ यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. तर, जुने गोवे आणि दोना पाऊला येथे पुतळे प्रदर्शित करण्यात आले आहेत. असे मिरांडा कुटुंबाने उभारलेल्या मारियो गॅलरी कडून मत व्यक्त करण्यात आले आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मारियो गॅलरीचे क्युरेटर गेरार्ड दा कुन्हा यांनी गॅलरीकडून राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि G20 कार्यक्रमांचे प्रभारी नोडल अधिकारी यांना कायदेशीर नोटीस पाठवले जाणार असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com