Goa Monsoon 2023 Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: सतर्क राहा, काळजी घ्या! गोवा, कोकणात रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

पावासामुळे सकल भागात पाणी साचण्यासह काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होईल.

Pramod Yadav

मागील दोन आवड्यांपासून गोवा, कोकण आणि महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद होत आहे. भारतीय हवामान खात्याने गोवा आणि कोकणात रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात कोकण पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज खात्याने व्यक्त केला आहे.

पावासामुळे सकल भागात पाणी साचण्यासह काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने 26 जुलै रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी ते मुसळधार पावासाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांना हवामान खात्याकडून वारंवार मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी राज्यात नोंद झालेल्या पावसाची आकडेवारी (मिमि)

सांगे 121.0, फोंडा 117.0, केपे 100.8, मडगाव 99.0, काणकोण 82.2, पणजी 73.5, मुरगाव 79.6, वाळपई 65.8, पेडणे 63.8, म्हापसा 63.3, दाबोळी 62.0, साखळी 58.8 मिमि पावसाची नोंद झाली.

दरम्यान, गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अंजुणे वगळता सर्व धरणे ओव्हफ्लो झाली आहेत. अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत अंजुणे धरण देखील भरेल असे शिरोडकर म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT