Goa Voter List Deletion: गोव्यात 35 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा काँग्रेसचा दावा; वगळलेल्यांना मदतीचा हात देणार

SIR Electoral Roll Revision: मतदार यादीतून हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीने केला आहे.
SIR Electoral Roll Revision
Goa Voter List DeletionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: मतदार यादीतून हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीने केला आहे. गोव्यात किमान ३५ हजार मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष आसिस नोरोन्हा, प्रवक्ते सावियो कुतिन्हो आणि पीटर डिसोझा यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेत केले.

नोरोन्हा यांनी मतदार यादीत करण्यात आलेल्या फेरफारांचा निषेध केला. राजकीय फायद्यासाठी मतदार याद्यांमध्ये बदल करू नयेत. प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांचीही नावे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेत यापूर्वी मतदान केलेल्या मतदारांकडूनही विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. मात्र, भाजपच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांकडून केवळ आधार कार्डाच्या आधारे नावे समाविष्ट केली जात असल्याचा आरोप सावियो कुतिन्हो यांनी केला.

SIR Electoral Roll Revision
Goa Politics: आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचे आरोप; चौकशी करा, काँग्रेसचे भाजपला चर्चेचे आव्हान

काही मतदारांचे फॉर्म क्रमांक ६ देखील नाकारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगावातील एका मतदान केंद्रावर ५५१ मतदारांपैकी ४१ जणांची नावे अनोळखी असल्याचे कारण देऊन नाकारण्यात आल्याची माहिती पीटर डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.