IND vs NZ: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाने रचला इतिहास! 720 धावा ठोकत कसोटी क्रिकेटमध्ये केला महाविक्रम; 16 वर्षांनंतर मोडला स्वतःचाच रेकॉर्ड

Team India Created History With 720/9d Score: न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार फलंदाजीच्या जोरावर विक्रमांची अक्षरशः बरसात केली.
Team India Created History With 720/9d Score
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Team India Created History With 720/9d Score: न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार फलंदाजीच्या जोरावर विक्रमांची अक्षरशः बरसात केली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 368 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 166 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 720 धावांचा डोंगर उभारुन डाव घोषित केला. या ऐतिहासिक खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 352 धावांची भक्कम आघाडी मिळाली.

भारताच्या (India) डावाची सुरुवात दमदार झाली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी 130 धावांची सलामी भागीदारी रचली. यशस्वीने 89 चेंडूंत 85 धावांची खेळी खेळली, तर केएल राहुलने 136 धावा ठोकत शतक साकारले. देवदत्त पडिक्कलने 80 धावांचे योगदान दिले, मात्र कर्णधार शुभमन गिल 98 धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले.

Team India Created History With 720/9d Score
IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

मधल्या फळीत यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आक्रमक फटकेबाजी करत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर 128 धावांची तडाखेबंद खेळी खेळली. ध्रुव जुरेलनेही 78 धावा करत डावाला भक्कम आधार दिला. तळाच्या फळीत अंशुल कंबोजने 38, वॉशिंग्टन सुंदरने 24 आणि आकाश दीपने 13 धावांची भर घालत संघाला 720 धावांपर्यंत पोहोचवले.

Team India Created History With 720/9d Score
IND vs NZ: बुमराह IN, रेड्डी OUT! पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11, गिल-गंभीर घेणार मोठा निर्णय?

या धावसंख्येसह भारताने परदेशातील कसोटी सामन्यातील आपला सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी भारताने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे 707 धावा केल्या होत्या; तो विक्रम आता मोडीत निघाला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडमधील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर कसोटीच्या एका डावात 700 हून अधिक धावा करणारा भारत हा पहिलाच पाहुणा संघ ठरला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांनाही आजवर अशी कामगिरी करता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.