Karapur Mega Project: कारापुरात वादग्रस्त प्रकल्प नकोच; अभिजित दीपके यांची ठाम भूमिका, गौरेश घाडींना संरक्षण देण्याची मागणी

Karapur Mega Residential Project Controversy: सरकार बिल्डरांच्या घशात गोवा घालण्यास निघाले असून राज्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
Karapur Mega Residential Project Controversy
Karapur Mega ProjectDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: सरकार बिल्डरांच्या घशात गोवा घालण्यास निघाले असून राज्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गोव्याच्या अस्तित्वाला घातक ठरणारे ‘३९ ए’ कलम तातडीने रद्द करावे, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रमुख अभिजित दीपके यांनी केली. तसेच गाव उद्ध्वस्त करणारा कारापूर येथील मेगा निवासी प्रकल्पही रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

धावस्करवाडा-कारापूर येथे झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर दीपके यांनी शनिवारी सायंकाळी कारापूर गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी वादग्रस्त मेगा निवासी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीमागील कारणे जाणून घेत त्यांनी कार्यकर्ते गौरेश घाडी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

Karapur Mega Residential Project Controversy
Goa Voter List Deletion: गोव्यात 35 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा काँग्रेसचा दावा; वगळलेल्यांना मदतीचा हात देणार

यापुढे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कारापूरला जाण्यापूर्वी दीपके यांनी गोमेकॉत जाऊन गौरेश घाडी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गोमेकॉत उपचार सुरू असतानाही घाडी तेथे सुरक्षित नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे घाडी यांना योग्य संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.