Goa Monsoon Red Alert Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: रेड अलर्टमुळे गोव्यात शाळा, महाविद्यालय बंद पण अंगणवाडी सुरू? पालकांत संताप

गोवा हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon 2023: गोवा हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, राज्यातील अंगणवाडी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक भागात अंगणवाडी भरवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

अंगणवाडी बंद ठेवण्याबाबत सूचना मिळाली नसल्याचा खुलासा धारबांदोडा तालुक्यातील एका अधिकाऱ्याने केला आहे.

गोवा हवामान खात्याने आज (गुरूवारी) राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याची सूचना शिक्षण खात्याच्या वतीने देण्यात आली. गोवा विद्यापीठाने देखील महाविद्यालय बंद ठेवण्याची सूचना दिली.

दरम्यान, अंगणवाडी बंद ठेवण्याबाबत सूचना मिळाली नसल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात विविध ठिकाणी अंगणवाडी सुरू ठेवण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही राज्याच्या महिला व बाल विकास विभागात संपर्क केला. महिला व बाल विकास विभागाच्या संचालक संगीता परब सचिवालयात बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुट्टीचे आदेश काढण्यात आले होते की नाही? याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, राज्यात गुरूवारी मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबत माहिती दिली होती. महाविद्यालयांना देखील आज सुट्टी देण्यात आली. गोवा विद्यापीठाने देखील याबाबत परीपत्रक काढून विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व विभागांना उद्या, 6 जुलै रोजी सुट्टी असेल, असे कळवले.

मात्र, अंगणवाडीबाबत अशी सूचना अथवा परीपत्रक समोर आले नसल्याने, संभ्रम झाल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT