मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय; मुंबई HC ने महाराष्ट्र सरकारला झापलं, ठोठावला दंड

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH-66) काही भागांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत महाराष्ट्र सरकाला तीव्र शब्दात झापलं आहे. उच्च न्यायालयाने NHAI-राज्य सरकारला दंडही ठोठावला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. हायवेच्या बांधकामात निष्काळजीपणा केल्याबद्दल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राज्य सरकारला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने बुधवारी हा दंड ठोठावला आहे.

2020 पर्यंत हा महामार्ग बांधण्यात येणार होता, असे सांगण्यात आले, मात्र या मार्गातील अनेक भागात खड्डे बुजवायचे आहेत. या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. NHAI आणि राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तिसऱ्यांदा धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतरही खड्डे दुरुस्त झाले नाहीत. अशी माहिती याचिकाकर्ते अधिवक्ता ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.

Mumbai Goa Highway
Goa Monsoon 2023: राज्यात कोसळधार! दरड, झाडं कोसळून विविध ठिकाणी नुकसान

यापूर्वी, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण, महामार्गाचे रुंदीकरण केले जात असल्याने खड्ड्यांच्या प्रश्नाकडे सध्या लक्ष देण्याची गरज नाही, तसेच, येत्या काळात खड्डे दूर केले जातील असे हमीपत्र एनएचएआयने न्यायालयासमोर दिले होते.

एनएचएआयने घेतलेला दोन वर्षांचा कालावधी 2020 मध्ये आधीच संपला आहे म्हणून खंडपीठाने एनएचएआयला मुदतवाढीसाठी अर्ज का केला नाही असा सवाल केला.

Mumbai Goa Highway
नदी नव्हे रस्ता! 2009 साली रहिवासी वाहून गेलेल्या आदीव्हाळ रस्त्यावर पुन्हा पावासाचे पाणी

दरम्यान, आम्ही निविदा काढल्या होत्या आणि काम एका कंत्राटदाराला दिले होते. मात्र, काम पूर्ण न केल्याबद्दल NHAI ने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि कंत्राटदाराने दिल्ली उच्च न्यायालयात दुसरा अर्ज दाखल केला. असे उत्तर NHAI तर्फे हजर झालेल्या वकिलांनी न्यायालयात दिले.

अधिवक्ता पेचकर यांनी 2 जुलै 2023 रोजी काढलेली मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची छायाचित्रे न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत जोडली. खंडपीठाने एनएचएआयचे प्रकल्प संचालक आणि पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता यांना चार आठवड्यांत सर्वेक्षण करून उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com