Goa Monsoon 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्ते जलमय; ऑरेंज अलर्ट

रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon 2023: चतुर्थीपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून मागील दोन दिवस काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आज, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने राज्याला झोडपले.

दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने कोकण-गोवा किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या शनिवार आणि रविवारीही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आज शुक्रवारी व उद्या शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात मागील 24 तासांत 2.37 इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत एकूण 128.9 इंच पावसाची नोंद झाली आहे.

पणजीतील रस्ते बुडाले

पणजीतील रस्ते पाण्याखाली गेले असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना दृश्‍यमानता कमी झाल्याने वाहने सावकाश चालवावी लागत होती.

गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक तसेच केरळ किनारपट्‍टीत पाऊस सक्रिय असून चक्रीवादळाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मच्छिमारांना इशारा

राज्यासह महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीतील बंदरांना पावसाचा जोर वाढणार असल्याने तसेच 45 ते 55 कि.मी. प्रतितास वारे वाहण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

Goa News Live Update: आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

SCROLL FOR NEXT