Manickam Tagore Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: विधानसभा अधिवेशनपूर्वी काँग्रेस प्रभारी गोवा दौऱ्यावर, काय कानमंत्र देणार?

Pramod Yadav

गोवा काँग्रसचे प्रभारी मनिकम टागोर आजपासून तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेसच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आलीय. मनिकम टागोर तीन दिवस राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते, ब्लॉक अध्यक्ष, समिती सदस्यांची भेट घेऊन चर्चा करतील असे काँग्रेसने म्हटले आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होत आहे, त्यामुळे टागोर काँग्रेस नेत्यांना काय कानमंत्र देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

असा असेल मनिकम टागोर यांचा दौरा

आज (दि.05 जुलै) मनिकम टागोर उत्तर गोव्यातील मनोहर विमानतळावर दुपारी साडेतीनच्या सुमारास दाखल होती. सायंकाळी सहा वाजता ते पणजी तील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता कार्यकारी समितीची बैठक होईल तर सायंकाळी साडेपाच वाजता ब्लॉक अध्यक्षांची बैठक होईल.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता मनिकम टागोर एक बैठक घेतील आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी दोनच्या सुमारास ते बंगळुरू रवाना होतील. असे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या टागोर यांच्या दौऱ्यात माहिती दिली आहे.

पावसाळी अधिवेशन

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्य सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. 10 ऑगस्टपर्यंत चालणारे हे अधिवेशन 18 दिवस सुरू असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनासाठी आत्तापर्यंत 1,108 प्रश्न आले असून, त्यापैकी 272 तारांकित आणि 836 अतारांकित प्रश्न आहेत. तसेच, आत्तापर्यंत एकही सरकारी किंवा खासगी विधेयक दाखल झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT