Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

'सांत आंद्रे'तील भू-रूपांतरे स्थगित, आंदोलन मागे; सहाव्या दिवशी वीरेश बोरकरांच्या उपोषणाची सांगता

Viresh Borkar hunger strike Goa: जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्याकडून स्वीकारत आमदार वीरेश बोरकर यांनी सहाव्या दिवशी रात्री ११ वाजता उपोषण मागे घेतले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नगरनियोजन कायद्याच्या कलम ‘३९-अ’चा वापर करून सांत आंद्रे मतदारसंघात मोठ्या प्रकल्पाच्या भू-रूपांतरासाठी दिलेल्या अंतिम परवानग्या संस्थगित ठेवण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्याकडून स्वीकारत आमदार वीरेश बोरकर यांनी सहाव्या दिवशी रात्री ११ वाजता उपोषण मागे घेतले.

तत्पूर्वी, त्यांनी टीसीपी कार्यालयात फाईल्स गहाळप्रकरणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मिळविले.

ज्येष्ठ वकील नॉर्मा आल्वारिस यांच्या हस्ते श्री देवी सातेरीचा प्रसाद भक्षण करून त्यांनी सहा दिवस चाललेल्या बेमुदत उपोषणाची सांगता केली. दुपारी जिल्हाधिकाऱी असे पत्र घेऊन बोरकर यांना भेटले, तेव्हाच आंदोलन मागे घेतले जाणार हे स्पष्ट झाले होते.

बोरकर यांच्या सुचनेनुसार, बदललेल्या मजकुराचे पत्र रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सुपूर्द केले आणि काही वेळातच बोरकर यांनी आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले.

रूपांतर संस्थगित ठेवण्यात येत असल्याचे नगररचनाकार वर्तिका डागर यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले. पत्रासोबत कोणकोणती भू-रूपांतरे स्थगित ठेवली आहेत, याची यादीही बोरकर यांच्या मागणीनुसार पत्राला जोडली आहे. बोरकर यांनी पत्र मिळाल्यावर त्याविषयी डागर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.

आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्हींकडून योग्य ती आश्वासने मिळाल्यावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि कलम ‘३९-अ’ रद्द करण्यासाठीचा लढा सुरू झाला आहे तो पुढे नेला जाईल, असे आश्वासन देत उपोषण तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT