Dengue Cases In Goa Margao Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases In Goa: पाचवर्षीय बालकाचा मृत्‍यू डेंग्‍यूमुळे?

Margao News: भागातील आणखी दोन बालकांना डेंग्‍यूची बाधा; इस्‍पितळात उपचार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, रुमडामळ-दवर्ली येथे डेंग्‍यूमुळे पाचवर्षीय बालकाचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा स्‍थानिकांचा हवाला देत नावेलीचे आमदार उल्‍हास तुयेकर यांनी केला. या भागातील आणखी दोन बालकांना डेंग्‍यूची बाधा झाली असून त्‍यांच्‍यावर इस्‍पितळात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्‍यांनी दिली.

मात्र, त्‍या बालकाचा मृत्‍यू डेंग्‍यूमुळेच झाला की अन्‍य कुठल्‍या कारणामुळे हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही, अशी माहिती या भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

डेंग्‍यूची बाधा झाल्‍यामुळे या बालकाला इस्‍पितळात दाखल केले होते. त्‍यातच काल (गुरुवारी) त्‍याचा अंत झाला, अशी माहिती आमदार तुयेकर यांनी दिली.

आज, शुक्रवारी आमदार तुयेकर यांनी उर्फान मुल्‍ला आणि मायणा-कुडतरी आराेग्‍य केंद्राचे कर्मचारी त्‍यांच्‍याबरोबर ज्‍या परिसरात हा मुलगा राहात होता, त्‍या परिसराची पाहणी केली. या भागात पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे.

शिवाय लोक पिंपामध्‍ये पाणी साठवून ठेवतात. त्‍यामुळे या भागात डेंग्‍यूचे डास तयार झाल्‍याचा दावा त्‍यांनी केला. स्‍थानिकांनी अशाप्रक़ारे पाणी साठवून ठेवू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

दरम्‍यान, मायणा-कुडतरी आरोग्‍य केंद्राचे आरोग्‍याधिकारी डॉ. वल्‍लभ नाडकर्णी यांना यासंदर्भात विचारले असता, त्‍या बालकाचा मृत्‍यू डेंग्‍यूमुळेच झाला की अन्‍य कुठल्‍या कारणामुळे हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

मात्र, त्‍या भागात काही डेंग्‍यूचे रुग्‍ण सापडले होते ही गोष्‍ट खरी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. डेंग्‍यूचे रुग्‍ण सापडले असले तरी या भागात डेंग्‍यूचा उद्रेक झाला, असे म्‍हणण्‍याइतपत गंभीर स्‍थिती नाही. तरीही आम्‍ही खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

katrina kaif Pregnant: "ही तर 2 वर्षांपासून गरोदर" विकी-कतरीनाची 'गुड न्यूज' चर्चेत, नोव्हेंबरमध्ये पाळणा हलणार?

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे झाले; 'जैश'च्या टॉप कमांडरने जाहीरपणे केलं मान्य Watch Video

Asia Cup दरम्यान युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अडचणीत; 'ED'ने बजावले समन्स, नेमकं प्रकरण काय?

Omkar Elephant: भल्यामोठ्या 'ओंकार' हत्तीला कसे परतवले सिंधुदुर्गात? पहा Video

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

SCROLL FOR NEXT