MLA Rodolfo Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assembly Monsoon Session 2025: प्रश्नोत्तराच्या तासांत जुने गोवे चर्च परिसरात बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेला बंगल्याचा विषय जोरदार गाजला.

Pramod Yadav

पर्वरी: पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचा प्रश्नोत्तराचा तास विरोधकांनी गाजवला. जुने गोवे चर्च परिसरातील बेकायदेशीर बंगल्याच्या विषयामुळे कामकाज १० मिनिटे स्थगित करावे लागले. याचवेळी चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केली. यासह जुने गोवे येथील चर्चबाबत त्यांनी विविध प्रश्न मांडले.

आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला जुने गोवे चर्च परिसराच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा, या परिसरात बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत यासाठी बफरझोन निश्चित करा तसेच चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा, अशा मागण्या केल्या होत्या.

त्यावर बोलताना मंत्री फळदेसाई यांनी जुने गोवेतील चर्च युनेस्कोने जागतिक वारसास्थळे म्हणून जाहीर केलेले आहेत. त्यामुळे हे चर्च भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (एएसआय) अखत्यारीत येतात.

गोवा पुरातत्व खात्याअंतर्गत तेथील जे चर्च येतात, त्यांचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. या परिसरात बेकायदा बांधकामे येऊ नयेत, यासाठी शंभर मीटरचा बफरझोन घालण्यात आलेला आहे. संवर्धन आराखड्याबाबत नगरनियोजन खात्याशी चर्चा सुरू आहे, अशी उत्तरे दिली.

दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासांत जुने गोवे चर्च परिसरात बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेला बंगल्याचा विषय जोरदार गाजला. हा बंगला राज्य सरकारने तत्काळ पाडावा, अशी मागणी करीत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी 'हा विषय न्यायप्रविष्ठ आहे,' असा दावा केल्यानंतर संतप्त विरोधकांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. सभागृहातील वातावरण तंग झाल्याने सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

iFFI 2025: 'कोमात असताना स्वप्नात खोल समुद्र, घनदाट जंगल दिसायचे', पेस्कॅडोर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितली निर्मितीमागची रंजक कथा

Goa Revenue: स्‍टँप ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात घट! अहवालातील आकडेवारीतून उघड; GST वरील करांत मात्र वर्षभरात वाढ

Bethora: '..आम्हाला आंघोळ करणेही अशक्य'! बेतोडा भागात पाणीबाणी; टंचाईमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल

Arambol: हरमल-भटवाडीत आंदोलन पेटले! ‘झोन’ बदलाचा वाद ऐरणीवर, जमीन विक्री थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांचे निवेदन

IFFI 2025: 'इफ्फीत मी पहिल्यांदाच आली आहे'! अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा हटके अंदाज; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सिनेमाचे होणार स्क्रीनिंग

SCROLL FOR NEXT