.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी: जुने गोवे चर्च परिसरात बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेला बंगला राज्य सरकारने तत्काळ पाडावा, अशी मागणी करीत सोमवारी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडली.
त्यातच हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केल्यानंतर विरोधकांनी संतप्त होत सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. त्यामुळे सभागृहातील वातावरण तंग झाल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित ठेवले.
वेळ वाया घालवण्यासाठीच विरोधकांचा खटाटोप
विरोधी आमदारांना जनतेच्या प्रश्नांवर चर्चा नको आहे. त्यांना सभागृहाचा वेळ वाया घालवायचा आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार कामकाज बंद पाडण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली. तर, विरोधी आमदारांना मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांकडून योग्य ती उत्तरे मिळत असल्याने ते नाराज झाल्याचा टोला मंत्री फळदेसाई यांनी लगावला
... आणि विरोधक बनले आक्रमक
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुने गोवे चर्च परिसरातील वराचा पचन आला नाका याचा विषय अनेक महिन्यांपासून राज्यात गाजत आहे. तरीही सरकार त्यावर कारवाई का करीत नाही, हा बंगला जमीनदोस्त का केला जात नाही, असे प्रश्न प्रश्न केले.
त्यावर, मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मंत्री फळदेसाई या दोघांनीही हा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे बंगल्यावर कारवाई केली जात नसल्याचे उत्तर दिल्याने अधिकच आक्रमक झालेल्या विरोधकांनी घेट सभापतींसमोरील हौदात जाऊन घोषणाबाजी सुरू केली.
त्यामुळे वातावरण तंग झाल्याने सभापती तवडकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केले. दहा मिनिटांनंतरही विरोधकांनी पुन्हा उभे राहत तीच मागणी सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत सभापतींनी कामकाज सुरू केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.