MLA Divya Rane Dainik Gomantak
गोवा

MLA Divya Rane: पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाचे डोंगुर्लीत उद्‍घाटन, गोव्यातील ठरलाय पहिलाच पाणलोट प्रकल्प

गोमन्तक डिजिटल टीम

MLA Divya Rane पाणी हा पृथ्वीवरील एक महत्त्वाचा घटक आहे, पण हे मूल्यवान द्रव्य अचानक मिळेनासे झाले तर आपले काय होईल? पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. सत्तरीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

मात्र, पाण्याबरोबर मातीसुध्दा वाहून जाते. तसेच उपाययोजना करत नसल्याने पाणी वाहून नदी, नाल्यात तसेच समुद्रात मिसळून ते नष्ट होते. आजच्या घडीला पाण्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

डोंगुर्ली ठाणे पंचायतीत पाणी आणि माती यांचे संवर्धन करण्यासाठी नाबार्ड व वनराई पुणे महाराष्ट्रतर्फे पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, स्थानिक सरपंच सरिता गावस, नाबार्डचे व्यवस्थापक डाॅ. मिलिंद भिरुड, वनराईचे ट्रस्टी सागर धारीया, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, पंचायत सचिव सर्वेश गावकर, उपसरपंच अनुष्का गावस, तानिया गावकर, सुचिता गावकर, सोनियी गावकर, नीलेश परवार, सुरेश आयकर, सुभाष गावडे आदींची उपस्थिती होती.

आमदार पुढे म्हणाल्या, दिवसेंदिवस सत्तरीत पाण्याची समस्या भासत आहे. मात्र, ते साठवून ठेवण्यासाठी काहीच उपाययोजना आखल्या नव्हत्या.

या प्रकल्पामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. या प्रकल्पाव्दारे नदी, नाले, विहिरी आदींसाठी पाण्याची क्षमता वाढवून पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होईल.

नाबार्डचे डाॅ. मिलींद भिरुड म्हणाले, गेल्या 40 वर्षांपासून आम्ही गोव्यात काम करत आहोत. मात्र, अशाप्रकारचा हा गोव्यातील पहिलाच प्रकल्प आहे. गोळावली हा गाव उंच माथ्यावर असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहते.

नैसर्गिक जलस्त्रोतामुळे अशाप्रकारच्या प्रकल्पाव्दारे शेती बागायतीसाठी उपयोगात येईल. या प्रकल्पाव्दारे जलसंवर्धन, जंगल संवर्धन, जमीन संवर्धन होईल. आता गोव्यात एक वेगळी क्रांती घडणार आहे आणि त्य़ासाठी सर्वांची जनभागीदारी गरजेची आहे.

सागर धारीया यांनी प्रकल्प व संस्थेविषयी माहिती देताना सांगिले की, पाणी आणि माती यांचे संवर्धन करण्यासाठी ठाणे डोंगुर्ली पंचायतीत नाबार्ड आणि वनराई संस्थेतर्फे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी व पाण्याची पातळी वाढण्यासाठी या पाणलोट प्रकल्पात स्थानिक कामगारांना रोजगार मिळणार आहे. तसेच टप्याटप्याने ठाणे पंचायतीतील इतर गावात पाणलोट क्षेत्र तयार करण्यात येणार आहेत.

राज्यातील पहिलाच प्रकल्प

पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प हा गोव्यातील पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प 4 वर्षे चालणार असून पहिल्या वर्षात दहा टक्के काम करण्यात येणार असून पाण्याच्या क्षमतेचा विचार करून नंतर पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात गोळावली गावात करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RATAN TATA Passess Away: उद्योग 'रतन' हरपले; देशाने दयाळू, विलक्षण माणूस गमावला, PM मोदींनी व्यक्त केला शोक

Ratan Tata RIP: रतन टाटांचा सदैव सोबती ‘गोवा’, Humens Of Bombay च्या CEO नी सांगितलेला किस्सा!

Ajay Devgan - Kajol Goa Villa: अजय देवगन - काजोलच्या गोव्यातील अलिशान व्हिलात राहण्याची संधी; एका रात्रीसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

चीनचे धाबे दणाणले! नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

SCROLL FOR NEXT