Accident In Chorla Ghat: चोर्ला मार्गावर वाहतूक ठप्प; तातडीने रस्ता दुरुस्ती करा

कणकुंबीवासीयांची मागणी: घाटमार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे संताप; ४ रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन
karmal Ghat Accident
karmal Ghat AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Accident In Chorla Ghat

चोर्ला मार्गे कणकुंबी रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून आजही या मार्गावर दोन ट्रकची धडक होऊन रस्त्यावरील वाहतूक आठ तासांहून अधिक काळ ठप्प झाली. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी येत्या सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कणकुंबी येथे रास्ता रोको करण्यात येणार असून जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन पारवाडचे सरपंच भिकाजी अर्जुन गावडे यांनी केले आहे.

karmal Ghat Accident
Illegal Sand Extraction: डिचोलीत बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक; ट्रक जप्त

यावेळी सविस्तर वृत्त असे की, बेळगाव-गोवा मार्गावरील बेटणा कणकुंबी दरम्यान ट्रक अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सकाळी चोर्ला घाटात दोन ट्रकांचा समोरासमोर अपघात होऊन सुमारे ८ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाला होता. या पार्श्वभूमीवर कणकुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी गावडे बोलत होते.

कणकुंबी, चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको बाबत आवाहन केले होते. त्यामुळे कंत्राटदाराने खड्डे बुजवण्याचा देखावा सुरु केला आहे,असे गावडेे म्हणाले.

karmal Ghat Accident
Goa Molestation Case: प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा

चोर्ला घाटमार्गात चिखले गावाजवळ आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामुळे जांबोटी चोर्ला मार्गावरील गोव्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच आडवे झाल्याने क्रेनने हटवण्याचे पोलिस प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. आठ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली.

लाखोंचा निधी खर्च ३५ हजार !

सुरळीत वाहतुकीसाठी चोर्ला घाट रस्त्याची चांगली दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले असताना ३५ लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, त्याचाही संपूर्ण योग्य विनियोग करण्याऐवजी रस्त्याचे अवघे ३५ हजार रुपयांचे निकृष्ट काम करण्यात आले आहे. तेंव्हा सदर रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती व्हावी. यासाठी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी रास्ता रोकोत सहभागी व्हावे,असे आवाहन भिकाजी गावडे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com