Goa MLA And Minister Leh Ladakh Study Tour 
गोवा

Goa MLA Ladakh Tour: गोव्याचे आमदार गुजरातनंतर आता लेह-लडाखच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार

पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक आमदारांनी नोंदणे करण्याचे आवाहन तवडकरांनी केले आहे.

Pramod Yadav

Goa MLA And Minister Leh Ladakh Study Tour: गोव्यातील मंत्री आणि आमदार केंद्र शासित प्रदेश लेह-लडाख येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी याबाबत प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक आमदारांनी नोंदणे करण्याचे आवाहन तवडकरांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आमदार आणि मंत्र्यांचा येत्या 6 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लेह लडाख येथे अभ्यास दौरा नियोजित करण्यात आलाय. पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक आमदारांनी 31 ऑगस्टपर्यंत इच्छा प्रकट करायची आहे. अशी माहिती समोर आली आहे.

पाच दिवसांच्या या दौऱ्यात मंत्री आणि आमदार कोणत्या ठिकाणी भेट देणार आहेत तसेच, कोणत्या विषयाशी निगडीत हा अभ्यास दौरा असेल याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, फेब्रुवारीत नऊ आमदार गुजरात दौऱ्यावर गेले होते त्यानंतर आमदारांचा हा दुसरा दौरा असेल.

गुजरात दौऱ्याला विजय सरदेसाईंना केला होता विरोध

गोवा सरकारच्या वतीने गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी 19 ते 21 फेब्रुवारीला अभ्यास दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यावर विजय सरदेसाई यांनी सडकून टीका केली होती.

जनतेच्या पैशावर काढलेल्या मौजमजेच्या ट्रिपमध्ये मला रस नाही असे म्हणत या अभ्यास दौऱ्याच्या शिष्टमंडळातून माझे नाव वगळावे अशी मागणी सरदेसाई यांनी केली होती. मंत्री गुजरात मध्ये सुप्रसाशन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्यावर जात आहेत ही हास्यास्पद बाब आहे. असेही सरदेसाई म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT