गोवा

Water Sports Booking Issue: महाराष्ट्रातील वॉटर स्पोर्ट्स बुकिंग गोव्यातून? पर्यटनमंत्री रोहन खंवटेंचा ट्रॅव्हल एजन्सींना इशारा; दलालांवर आता कायद्याचा बडगा!

Goa Maharashtra Tourism Conflict: किनारी भागांतील मतदारसंघांचे आमदार आणि जलक्रीडा प्रकारांच्‍या मालकांशी बुधवारी पणजीतील पर्यटन भवनात घेतलेल्‍या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Sameer Panditrao

पणजी: महाराष्‍ट्रातील मालवण तसेच इतर ठिकाणी चालणाऱ्या जलक्रीडा प्रकारांच्‍या तिकिटांची गोव्‍यातून बुकिंग करून देणाऱ्या ट्रॅव्‍हल एजन्‍सी आणि दलालांवर गोवा पर्यटन उद्योग कायद्यांतर्गत कारवाई करण्‍याचा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी दिला.

किनारी भागांतील मतदारसंघांचे आमदार आणि जलक्रीडा प्रकारांच्‍या मालकांशी बुधवारी पणजीतील पर्यटन भवनात घेतलेल्‍या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, पर्यटन संचालक केदार नाईकही यावेळी उपस्‍थित होते.

देश–विदेशातील पर्यटकांना गोव्‍याकडे (Goa) अधिकाधिक आकर्षित करण्‍याच्‍या अनुषंगाने पर्यटन खाते काम करीत आहे. राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांना जलक्रीडा प्रकारांचा मनमुराद आणि पारदर्शकपणे आस्‍वाद घेता यावा यासाठी जलक्रीडा प्रकारांच्‍या मालकांना विश्‍‍वासात घेऊन खात्‍याने त्‍याबाबतचे दर निश्‍चित केले आहेत. यातून स्‍थानिक जलक्रीडा मालकांना अधिकाधिक प्रोत्‍साहन देण्‍याचा खात्‍याचा प्रयत्‍न आहे.

तरीही राज्‍यातील काही ट्रॅव्‍हल एजन्‍सी आणि दलाल गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांना महाराष्‍ट्रातील मालवण तसेच जलक्रीडा प्रकार सुरू असलेल्‍या इतर ठिकाणी नेण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍याचा मोठा फटका पर्यटन व्‍यवसाय आणि राज्‍याच्‍या महसुलाला बसत आहे. त्‍यामुळेच अशा कृत्‍यांत सहभागी असलेल्‍या ट्रॅव्‍हल एजन्‍सी आणि दलालांवर स्‍थानिक पंचायती आणि जलक्रीडा संघटनांच्‍या सहकार्याने गोवा पर्यटन उद्योग कायद्याअंतर्गत कारवाई करण्‍याचा निर्णय बुधवारच्‍या बैठकीत घेण्‍यात आल्‍याचेही मंत्री खंवटे म्‍हणाले.

दरम्‍यान, जलक्रीडा प्रकारांसाठी बाहेरून अधिक दराने तिकिटे आरक्षित करणारे पर्यटक गोव्‍यातून जाताना स्‍थानिक जलक्रीडा चालवणाऱ्या मालकांच्‍या नावाने गोव्‍याची बदनामी करीत आहेत. काही ट्रॅव्‍हल एजन्‍सी आणि दलाल पर्यटकांना अशा पद्धतीने लुटत आहेत. त्‍यांच्‍यावर कारवाईसाठी सर्वांनी एकत्र येणे आणि राज्‍यातील पर्यटनाचा पर्यटकांना चांगला अनुभव मिळवून देणे गरजेचे आहे, असे आमदार मायकल लोबो यांनी स्‍पष्‍ट केले.

‘पेड इन्‍फ्‍ल्‍यूएंजर्स’कडून गोव्‍याची बदनामी

राज्‍यात येणारे पर्यटकच गोव्‍याच्‍या पर्यटनाचे (Tourism) ब्रँड अँबेसिडर बनावेत. त्‍यांनी आपापल्‍या राज्‍यात जाऊन गोव्‍याच्‍या पर्यटनाची महती गावी, यासाठी पर्यटकांसाठी आवश्‍‍यक सोयी, सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत. त्‍यांना सुरक्षा देण्‍यात येत आहे. तरीही काही पर्यटक आणि ‘पेड इन्‍फ्‍ल्‍यूएंजर्स’कडून जाणीवपूर्वक गोव्‍याची बदनामी सुरू आहे, असे मंत्री रोहन खंवटे म्‍हणाले. राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांनी समस्‍या जाणवल्‍यास तत्‍काळ १३६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मान्‍सून काळात परवानगी नाही!

मान्‍सून काळात समुद्रातील जलक्रीडा प्रकार राहणे अत्‍यंत गरजेचे असते. तरीही गेल्‍या काही वर्षांत मान्‍सून काळातही राज्‍यात असे प्रकार सुरू असल्‍याचे निदर्शनास आलेले आहे. यापुढे बंदर आणि कप्‍तान खात्‍याकडून मान्‍सून काळात जलक्रीडा प्रकारांना परवानगी देण्‍यात येणार नाही, असेही मंत्री रोहन खंवटे यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Crime: हरमल हादरले! हात बांधले, धारदार शस्त्राने केला मानेवर वार; खूनप्रकरणी संशयित रशियन आरोपीला अटक

Bangladesh Violence: बांगलादेशात इस्लामिक कट्टरपंथीयांचं पाशवी कृत्य! हिंदू कुटुंबावर हल्ला करुन घर दिलं पेटवून; जीव वाचवण्यासाठी धडपड VIDEO

Pooja Naik: 'पूजा नाईक' प्रकरणावरुन विधानसभेत जोरदार खडाजंगी! 26 लाखांचा गुन्हा 17 कोटींवर कसा गेला? सरदेसाईंच्या प्रश्नावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

SCROLL FOR NEXT