Water Sports In Goa: जलक्रीडा ऑपरेटर्सचे होणार लवकरच ऑडिट, किनारपट्टी भागात पर्यटन खात्याकडून सुरक्षा उपाययोजना

Water Sports In Goa: सुरक्षा तपासणी, सागरी नियमांच्या अनुपालनाची पडताळणी आणि क्रू सदस्यांसाठी अनिवार्य सुरक्षा कवायतींचा समावेश असेल.
Water Sports | Goa
Water Sports | Goa Dainik Gomantak

Water Sports In Goa

‘नेरुल पॅराडाईज’ बोटीशी संबंधित घटनेनंतर पर्यटन खात्याने पर्यटक आणि रहिवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून सुरक्षा नियम आणि उपायांचे व्यापक पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जलक्रीडा बोटींसाठी नवीन अनिवार्य नोंदणीची सक्ती करण्यात येणार आहे.

त्यासाठी जलक्रीडा ऑपरेटर्सना अनौपचारिक नोटीस बजावून त्यांचे राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेतर्फे (एनआयडब्ल्यूएस) ऑडिट करण्यात येणार आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी पर्यटन खात्याने हे पाऊल उचलले आहे.

गोव्याच्या किनारपट्टीचा आनंद लुटणाऱ्या सर्व व्यक्तींची सुरक्षा निश्चित करण्याच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून पर्यटन खात्याने समुद्रातील बोटींसाठी नोंदणी सक्तीची केली आहे. सर्व जहाजे कडक सुरक्षा मानकांची पूर्तता करतात का, याची खात्री करून सागरी क्रियाकलापांचे निरीक्षण आणि नियमन वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पर्यटन विभागाने कॅप्टन ऑफ पोर्टसकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागण्यापूर्वी सर्व जलक्रीडा नौकांना विभागाकडून एनओसी घेणे आवश्यक असलेले निर्देश जारी केले आहेत. मात्र, याचे अनुपालन होत नाही.

कळंगुट समुद्रकिनारा आधीच जलक्रीडा उपक्रमांमुळे व्यस्त आहे. अतिरिक्त ऑपरेशन्ससाठी जागाच नाही. मुरगाव बंदराजवळ घडलेल्या या घटनेला बंदर कप्तान खाते जबाबदार आहे.

त्यामुळे सर्व संघटनांनी त्यांचा डाटा जमा करणे आवश्यक आहे आणि पर्यटन खात्याच्या परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व बोटींसाठी अनिवार्य नोंदणीची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे.

Water Sports | Goa
Banastarim Accident Goa: बाणस्तारी अपघाताचा 10 महिन्यांनंतर तपास पूर्ण, तिघांवर आरोप निश्‍चित

पर्यटनासाठी राज्य सुरक्षित!

अनिवार्य नोंदणीमध्ये तपशीलवार सुरक्षा तपासणी, सागरी नियमांच्या अनुपालनाची पडताळणी आणि क्रू सदस्यांसाठी अनिवार्य सुरक्षा कवायतींचा समावेश असेल. या वर्धित सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून गोवा हे पर्यटनासाठी सुरक्षित असल्याची खात्री देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे सुनील अंचिपका म्हणाले.

'राज्यातील सर्व पर्यटक बोटींची अनिवार्य नोंदणी केल्याने सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची खात्री करून, पाण्याच्या क्रियाकलापांचे अधिक प्रभावीपणे निरीक्षण करणे आणि त्यांचे नियमन करणे शक्य होईल,' असे पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपका म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com