Goa Mining: खाणींसाठी सरकारचे एक पाऊल पुढे!
Goa Mining: खाणींसाठी सरकारचे एक पाऊल पुढे! Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाणींसाठी सरकारचे एक पाऊल पुढे!

दैनिक गोमन्तक

पाळी: राज्यातील खनिज खाणी अद्याप बंदच असून फक्त लिलावाच्या खनिज मालाची तेवढी वाहतूक करण्यात आली आहे. अजूनही लीलावाचा खनिज माल शिल्लक असून या खनिज मालाची वाहतूक या ‘सिझन''मध्ये होणार आहे. मात्र खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी खाण महामंडळ स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्यपालांनी पाठिंबा दिल्याने खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नुकतीच राज्यपालांनी खाण महामंडळ मसुद्याला मंजुरी दिल्याने आता हे महामंडळ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील खनिज खाणींवर सुमारे सव्वा लाख कुटुंबे विसंबून असून खाणी दुसऱ्यांदा बंद झाल्यानंतर या कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेले अडिच वर्ष खाणी बंद आहेत. त्यापूर्वी साडेतीन वर्षे खाणी बंद होत्या. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झालेल्या खाण भागातील कुटुबियांना दुसरा रोजगार व्यवसाय शोधणे क्रमप्राप्त ठरले. मध्यंतरीच्या काळात गेल्या वर्षी कोरोनाची महामारी आल्याने रोजगाराचे पर्यायही खुंटले असल्याने आता केवळ खाणी सुरू होण्याची आशा खाण अवलंबितांना लागून राहिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार खाण महामंडळ स्थापन करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र त्यानुसार कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे सरकार खाण महामंडळ स्थापन करणार की खाणींचा लीलाव करणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र मागच्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींमुळे आता खाण भागात पुन्हा एकदा मशिनरी धडाडण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारने खाण महामंडळ स्थापन करून खाणींचा प्रश्‍न सोडवण्याची जोरदार मागणी खाण अवलंबितांकडून व्यक्त केली जात आहे.

मालकीवरून घोळाची शक्यता : गेली साठ वर्षे राज्यातील खनिज खाणी वैयक्तिकरीत्या काही लोकांकडून चालवल्या जात आहेत. वास्तविक हे खाण मालक संबंधित भागातील नसूनही त्यांनी सहा, सात दशके बिनधास्तपणे खनिज मालाची प्रचंड लुटमार केली. खाणी चालवताना या खाण मालकांनी संबंधित परिसर कुंपणे घालून त्यावर आपली मालकी दाखवली आहे. पंधरवड्याभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने खाणी पुन्हा आहे त्याच मालकांना चालवू देण्यास आडकाठी आणल्याने वास्तविक हा ताबा आता सरकारकडे आला आहे. त्यामुळे या खाण मालकांकडून संबंधित खाणी त्वरित सरकारने ताब्यात घेण्याची आवश्‍यकता आहे. ही प्रक्रिया शक्य तेवढ्या लवकर झाल्यास खाणी या सिझनमध्ये सुरू होऊ शकतात, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सरकारला खाणी महामंडळाद्वारे सुरू करायच्या होत्या. तर एवढा विलंब का लावला, हा प्रश्‍न आहे. आता सरकारने खाण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन त्यादृष्टीने कार्यवाही केली आहे, ही चांगली बाब असून वेळ काढू नका, त्वरित पुढील हालचाली करा. आहे त्या खाण मालकांनी आधीच ओरबाडून खाल्ले आहे, त्यांच्या घशात पुन्हा खाणी घालू नका.

रवींद्र गावकर (पिळये- धारबांदोडा)

राज्यातील खनिज खाणी केव्हाच सुरू झाल्या असत्या, मात्र या खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी नेमका पर्याय स्विकारण्यात मागच्या काळात बराच विलंब झाला. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खुद्द खाण पट्ट्यातील असल्याने खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात खाण अवलंबितांसाठी चांगली बातमी अपेक्षित आहे.

प्रदीप नाईक (तिस्क - उसगाव)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT