Goa Mines: किरकोळ अपवाद वगळता अडवलपाल खाणीसाठी शुक्रवारी (ता.१५) घेण्यात आलेली जनसुनावणी सुरळीतपणे पार पडली. सकाळी सुरू झालेली ही जनसुनावणी सायंकाळपर्यंत आटोपली.
या जनसुनावणीवेळी अपेक्षेप्रमाणे खाण व्याप्त अडवलपालच्या लोकांची उपस्थिती जाणवली नाही. मात्र, उपस्थित असलेल्या अडवलपालच्या लोकांनी खाणविरोधात भूमिका मांडली. मात्र, अपेक्षेप्रमाणे विरोधाची ‘धार’ दिसून आली नाही.
खाण परिक्षेत्र आणि पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालाला (ईआयए) अडवलपालच्या लोकांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘ईआयए’ अहवाल खोटा असल्याचा दावा करतानाच गाव उद्ध्वस्त होत असेल, तर गावात खाण व्यवसाय नकोच, अशी भूमिका मांडली.
तर थिवी आणि अन्य भागातील बहुतांश लोकांनी खाणीला समर्थन दिले. अडवलपाल-थिवी खाण ब्लॉकअंतर्गत फोमेन्तो रिसोर्सीस कंपनीला खाणीसाठी पर्यावरण दाखला (ईसी) मिळवण्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात आली होती.
जनसुनावणीवेळी ‘ईआयए’ अहवाल दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. तसेच नैसर्गिक जलस्रोत आणि शेती-बागायती नष्ट होत असेल तर आम्हाला खाण व्यवसाय नको, अशी भूमिका अडवलपालच्या लोकांनी घेतली.
प्रेमनाथ सिनाय साळगावकर, आनंद गाड, नेताजी गावकर, कला नाईक आदी अडवलपालच्या लोकांनी खाणीविरोधात भूमिका मांडली.
दुसऱ्या बाजूने सिरसई-थिवी आदी भागातील बहुतांश लोकांनी आपले मत मांडताना खाणीला समर्थन दिले. खाणपीडित घटकांच्या हितासाठी खाण व्यवसाय सुरू होणे, ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.