Goa Accident Case: मांडवी पुलावरील अपघात प्रकरणातील संशयित अंकित त्रिपाठीला सशर्त जामीन

Goa Accident Case: न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाण्याची अट त्याला घालण्यात आली आहे.
Accident Case Update
Accident Case UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case: मांडवी पुलावर झालेल्या भीषण अपघातात जावेद सडेकर याचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या ओडिशाचा कार चालक संशयित अंकित त्रिपाठी याला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला.

न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाण्याची अट त्याला घालण्यात आली आहे.
न्यायालयाने संशयिताला जामीन मंजूर करताना वैयक्तिक हमी देण्याबरोबरच दोन हमीदार देण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिस तपासकामात सहकार्य करावे व पोलिस बोलवतील तेव्हा उपस्थित राहावे. तपासकामात व्यत्यय आणू नये तसेच साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये अशा अटी आहेत.

जुन्या मांडवी पुलावरील अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत असलेला संशयित अंकित त्रिपाठी हा मद्यप्राशन करून कार चालवत होता.

Accident Case Update
Bicholim News: मयेतील कळसोत्सव यंदाही रद्द; भक्तांच्या उत्साहावर विरजण

ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तो उसळून नदीत पडला होता. संशयितीने घेतलेल्या मद्याचे प्रमाण नियमाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे अघड झाले आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. नदीत बुडालेल्या सडेकर याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सकाळी जुन्या सचिवालयाजवळ तरंगताना आढळला होता.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 304 व 279 खाली गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Court Bail Rejection
Karnataka Tourist Death Case
Thivim Land Forgery Case
Dr Vrushabh Doshi POCSO Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com