Taximan Taxi Union Dainik Gomantak
गोवा

दाबोळी विमानतळावर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या गोवा माईल्सचा झाला पत्ता कट

वास्को येथे आयोजित शनिवार पत्रकार परिषदेत वरील माहिती दाबोळी विमानतळावरील सर्वात जुने पिवळे काळे टॅक्सी व्यवसाय करणारे युनायटेड टॅक्सी मॅन युनियन तर्फे देण्यात आली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dabolim International Airport) बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या गोवा माईल्स टॅक्सी व्यवसायाला (Goa Miles Taxi Business) विमानतळावरून कायदेशीर हाकलून लावण्यात आले. यामुळे राज्य सरकारने (State Government) भूमिपुत्रांना न्याय दिला असल्याची माहिती युनायटेड टॅक्सीमॅन टॅक्सी युनियनने दिली आहे. वास्को येथे आयोजित शनिवार पत्रकार परिषदेत वरील माहिती दाबोळी विमानतळावरील सर्वात जुने पिवळे काळे टॅक्सी व्यवसाय करणारे युनायटेड टॅक्सी मॅन युनियन तर्फे देण्यात आली.

सदर पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष विद्याधर दिवकर, सरचिटणीस प्रसाद प्रभुगावकर, उपाध्यक्ष रामा नाईक, खजिनदार साईनाथ साळगांवकर, सहखजिनदार दिनेश शेट्ये, प्रताप केरकर, आनंद पेडणेकर, सुहास नाईक, प्रकाश नाईक व अखिल गोवा पिवळे काळे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक उपस्थित होते. पुढे माहिती देताना अध्यक्ष विद्याधर दिवकर म्हणाले की दाबोळी विमानतळावर 2018 मध्ये बेकायदेशीररित्या येऊन गोवा माईल्स यांनी एका प्रकारे गोव्यातील टॅक्सी व्यवसायाला संपवण्याचा कट रचला होता. यामुळे आम्हाला गोवा माईल्स टॅक्सी व्यवसाया विरोधात चळवळ सुरू करावी लागली. तसेच संपूर्ण गोव्यातून सुद्धा गोवा माईल्स विरोधात राज्यातील टॅक्सी संघटनेने आंदोलने छेडली होती.

अखेर राज्य सरकारने दाबोळी विमानतळावरील गोवा माईल्स टॅक्सी व्यवसायाला हाकलून लावले. राज्य सरकारने पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचे आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य लाभले असल्याची माहिती अध्यक्ष दिवकर यांनी दिली. संघटनेचे सरचिटणीस प्रसाद प्रभुगावकर यांनी सांगितले की कोविड महा मारीत दाबोळी विमानतळा बरोबर संपूर्ण गोव्यात टॅक्सी व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. त्यात 2018 पासून गोव्यात ॲप वर व्यवसाय करणाऱ्या गोवा माईल्सने दाबोळी विमानतळावर बेकायदेशीर पर्यटकांची सेवा करण्यास सुरुवात केली. याला संपूर्ण गोळ्यातून विरोध दर्शविल्यानंतर अखेर राज्य सरकारने गोवा माईल्स टॅक्सीचा परवाना विमानतळावरून रद्द केल्याची माहिती प्रभुगावकर यांनी दिली. यात मुरगाव तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा व राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे चांगले सहकार्य लाभले. एकाप्रकारे राज्य सरकारने गोव्यातील टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या नीज गोयकारांना गोवा माईल्सला विमानतळावरून काढून न्याय दिला आहे.

तसेच विमानतळावर बेकायदेशीर पर्यटकांना सेवा देणाऱ्या टॅक्सी चालकावर सुद्धा राज्य वाहतूक संचालका मार्फत कारवाई करण्यात येईल. दाबोळी विमानतळावर सध्या रॅन्ट अ कॅब बेकायदेशीर प्रमाणे टॅक्सी व्यवसाय करीत असून त्याच्या विरोधात वाहतूक संचालक कार्यालयात तक्रार दाखल केलेली असल्याची माहिती अखिल गोवा पिवळे काळे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली. गोवा माईल्स टॅक्सी व्यवसायाला विमानतळावर परवानगी देताना वाहतूक मंत्री गुदिन्हो यांना विश्वासात न घेतल्याने राज्यातील टॅक्सी व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सरकारच्या सहकार्याने दाबोळी विमानतळावरील पिवळे काळे टॅक्सी व्यवसायिकांना न्याय मिळाला असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT