E-rickshaw for Disabled Dainik Gomantak
गोवा

E-Rickshaw for Disabled: गोवा सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! दिव्यांग व्यक्तींसाठी ई-रिक्षा सेवा; पुढील महिन्यात होणार अंमलबजावणी

World Disabled Day 2024: गोव्यात दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, राज्य सरकारने विमानतळ, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक यासारख्या सार्वजनिक ठिकाणी ई-रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

E-rickshaw for Disabled At Goa

यशवंत सावंत

पणजी: गोव्यात दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, राज्य सरकारने विमानतळ, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक यासारख्या सार्वजनिक ठिकाणी ई-रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून गोवा माईल्सतर्फे ही सेवा अमलात आणण्यात येईल. राज्यातील सर्वच ठिकाणे दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य नाही; परंतु काही ठिकाणे प्रवेशयोग्य आहेत. आम्ही दिव्यांगांना प्रवेश मिळावा म्हणून साधनसुविधा तयार करण्याचे काम सुरू केल्याची माहिती दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

गोवा हे देशभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दिव्यांग व्यक्तींचेही गोवा पाहण्याचे स्वप्न असते. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणे दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य नसल्याने त्यांना ती पाहण्यास अडचणी येतात. गोव्याला सर्वसमावेशक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेणे अत्यंत

महत्त्वाचे आहे. राज्यातील अनेक ठिकाणे दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य नसल्याचे पावसकर यांनी मान्य केले असले तरी सरकारने त्यासाठी

विशेष विभाग स्थापन करून सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्य बनविण्याचे काम हाती घेतल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी आयोजित पर्पल महोत्सवात दिव्यांगांसाठी प्रवेशयोग्यतेवर भर दिला होता. यामुळे दिव्यांगांना अनेक ठिकाणी जाण्याची सोय उपलद्ध करण्यात आम्हाला यशही आले होते. त्यानिमित्त अनेक हॉटेलमध्ये आणि मिरामार समुद्रावर दिव्यांगांना प्रवेश व्यवस्था करण्यात आली, असे पावसकर यांनी सांगितले.

३२६ कृत्रिम पायांचे वाटप

दिव्यांग सक्षमीकरण विभागतर्फे आयोजित कार्यक्रमांत एकाच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत ३२६ दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय वाटप करण्यात आले. देशात एकाच दिवशी दिव्यांगांना एवढ्या मोठ्या संख्येने मदत करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले.

३ हजार जणांना लाभ

गोवा सरकारने १० जानेवारी २०२४ रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आर्टीफिशिअल लिम्ब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रादेशिक पुनर्वसन केंद्र आणि प्रधानमंत्री दिव्यशा केंद्र उघडले आहे. या केंद्राचा उद्देश राज्यमधील दिव्यांग व्यक्तींना मोफत साहाय्यक उपकरणे पुरवणे असून आजवर ३ हजार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ झाला आहे.

रोजगार मिळवून देण्यासाठी सक्रिय

पावसकर म्हणाले की, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने दिव्यांगांना रोजगार मिळविण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक कंपन्यांशी बोलून दिव्यांगांना काम देण्यातही विभागाला यश मिळाले आहे. अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे ताज आणि मेरियटसारख्या ब्रॅण्डनेदेखील दिव्यांगांना रोजगार मिळवून दिला आहे. पुढील दहा दिवसांत दिव्यांगांना अशा अनेक कंपन्यांमधून रोजगार मिळणार आहे.

‘रुग्णाश्रय’मध्ये मोफत उपचार

दिव्यांगांच्या उपचारासाठी स्पायनल कॉर्ड पुनर्वसन केंद्र, रुग्णाश्रय बांबोळी येथे सुरू करण्यात आले आहे. पाठीच्या कण्याच्या आजारावर उपचार घेण्यासाठी दिव्यांगांना गोव्याबाहेर जावे लागत होते. गोव्याबाहेर गेल्यानंतर येण्याजाण्याचा खर्चही तेवढाच वाढत होता. हे केंद्र गोव्यात उभारल्यानंतर आता तेच उपचार दिव्यांगांना मोफत या केंद्रात पुरविले जातात. आज हे केंद्र गोव्यात असल्याने याचा लाभ अनेकांना होत असल्याचे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT