Tourist Goa Dainik Gomantak
गोवा

मेरी जान को खतरा है! गोवा माईल्सच्या चालकाने येण्यास दिला नकार, पर्यटकाला करावी लागली 1 km पायपीट; आणखी एका महिलेला आला धक्कादायक अनुभव Watch Video

Goa Viral Video: गोव्यातील वाहतूक व्यवस्था आणि टॅक्सी चालकांच्या दादागिरीवर सरकार आणि पोलिसांनी तोडगा काढण्याची गरज नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

पणजी: टॅक्सी माफियांच्या अरेरावीचा गुजराती पर्यटक महिलेला समाना कराव्या लागल्याच्या घटनेला, पंधरा दिवस झाले नसताना गोव्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टॅक्सी माफियांना घाबरुन गोवा माईल्सच्या टॅक्सी चालकाने हॉटेलजवळ येण्यास नकार दिला. यामुळे महिलेला सामानाच्या बॅगा घेऊन एक किलोमीटर पायपीट करावी लागली.

पर्यटक महिलेने याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. “आम्ही आमच्या ठिकाणापासून एक किलोमीटर चालत आलो आहोत. गोवा माईल्सची टॅक्सी बुक केली होती पण, त्यांना मालमत्ते येण्यास परवानगी नाही. त्यामुळे आम्ही सामानाच्या तीन बॅगा घेऊन रस्त्यावरुन चालत आलो आहोत”, असे पर्यटक महिला व्हिडिओत सांगताना दिसत आहे. 

"आमचा ड्रायव्हर (गोवा माईल्सचा) सांगू लागला की तो तिथे आला तर त्याच्या जीवाला धोका आहे. साहित्याच्या बॅगा घेऊन आम्ही एवढ्या दूर चालत आलो आहोत", असे महिला म्हणत आहे. तसेच, समोरुन टॅक्सी चालक येताना व्हिडिओत दिसत आहे.

महिलेने शेअर केलेल्या अनुभवावरुन नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. गोव्यातील वाहतूक व्यवस्था आणि टॅक्सी चालकांच्या दादागिरीवर सरकार आणि पोलिसांनी तोडगा काढण्याची गरज नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही जणांनी त्यांच्यासोबत देखील गोव्यात अशाच प्रकारची घटना घडली होती, असे मत व्यक्त केले आहे. तर, काही नेटकऱ्यांनी स्थानिक टॅक्सी चालक खूप पॉवरफूल असून, याबाबत काही केले जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये देखील अहमदाबाद येथील पर्यटक महिलेला स्थानिक टॅक्सी चालकांनी त्रास दिल्याचे समोर आले होते. महिलेला भर पावसात बॅगा घेऊन चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागली होती.

ऑनलाईन पद्धतीने बुक केलेल्या टॅक्सीमधून जाण्यास स्थानिक टॅक्सी चालकांनी महिलेला रोखले होते. त्यानंतर महिलेला त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर पंधरा दिवसांत पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT