सिद्धी जीत आरोलकर यांनी आपला वाढदिवस चार गरजू महिलांना स्टॉल वितरीत करून केला (Goa)
सिद्धी जीत आरोलकर यांनी आपला वाढदिवस चार गरजू महिलांना स्टॉल वितरीत करून केला (Goa) दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत ; सिद्धी जीत आरोलकर

Siddhesh Shirsat

Goa: महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या संसाराला हातभार लावावा. महिलांच्या प्रगतीसाठी सदोदित मांद्रे उदर्गत संस्था (Mandrem Udargat Sanstha) कार्यरत आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मगो पक्षाला पाठींबा (Support to MGP) द्यावा, असे आवाहन सिद्धी जीत आरोलकर यांनी केले. सिद्धी आरोलकर यांनी आपला वाढदिवस चार गरजू महिलांना स्टॉल वितरीत करून एक चांगला आदर्श घालून दिला. मोरजी येथे मांद्रे उदर्गत आणि मगो तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मगोचे नेते जीत आरोलकर, वंदना शेटगावकर, प्राची भिवशेट आदी उपस्थित होते.

वकील सिद्धी आरोलकर यांनी बोलताना म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे अनेकाना आर्थिक तसेच मानसिक नुकसान सोसावे लागले, सर्वसामान्यांची आर्थिकव्यवस्था फार कोलमडून गेली. सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला. त्याच पार्शवभूमीवर महिला जर छोटा - मोठा व्यवसाय करू इच्छितात, तर महिलांना थोडा पाठींबा देण्याची गरज आहे, असे सिद्धी आरोलकर यांनी सांगितले. अश्या महिलांना आमचा नेहमीच पाठींबा असणार असल्याचेही त्या बोलल्या.

वाढदिवस पार्टी पेक्षा महिलाना पायावर उभे करुया; जीत आरोलकर

मगोचे नेते जीत आरोलकर (MGP Leader Jeet Arolkar) यांनी बोलताना म्हणाले, आज पत्नीचा वाढदिवस एखादी पार्टी आयोजित करून पैसा खर्च करण्यापेक्षा गरजू महिलांना आधार देण्यासाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय करू पाहणाऱ्यांना गाडा (स्टॉल) देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. मांद्रे मतदार (Mandrem Constituency) संघाच्या विकासासठी आता मगो पक्षाच्या आमदाराची खरोखरच गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दिवसेंदिवस मगो पक्षाला वाढता पाठींबा मिळत आहे. मगोला पुन्हा गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मगोला साथ देण्याचे आवाहन जीत आरोलकर यांनी केले.

वंदना शेटगावकर यांनी बोलताना महिलाना वेळोवेळी मांद्रे उदर्गत संस्थेतर्फे जीत आरोलकर मदत करत असतात, आता आगमी निवडणुकीत आम्हा सर्वाना मगो पक्षाला साथ देवून आमचा विकास करून घ्यावा लागेल असे तिने सांगितले. प्राची भिवशेट यांनी मनोगत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT