पणजी: पोलिस कॉन्स्टेबल्सचे (police constables) महिला पोलिसासोबत वाहनात सुरू असलेल्या प्रेमसंबंध प्रकरणासंदर्भातील सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. तसेच पुरुष पोलिसाच्या पत्नीने म्हापसा पोलिस (Mapusa Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिस खात्याने त्या दोघांनाही सेवेतून निलंबित करण्याचा आदेश काढला. या व्हिडीओची चर्चा पोलिस खात्यात काल दिवसभर सुरू होती.
पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलेला रोशन मार्टिन (Panajim Transport Room) व महिला कॉन्स्टेबल ही जुने गोवे (Old Goa) पोलिस ठाण्यात सेवेत होती. पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नीने दिलेली तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून घेण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्यावर त्याची दखल घेण्यात आली व निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कॉन्स्टेबल रोशन मार्टिन याच्या विवाहबाह्य संबंधाबाबत त्याच्या पत्नीला संशय होता. त्यामुळे तिने पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. गिरी - म्हापसा येथे पतीची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असलेली तिने पाहिली. वाहनाच्या काचा काळ्या असल्याने आतील काही दिसत नव्हते, त्यामुळे तिने गाडीचे दार उघडताच पती एका तरुणीसोबत आढळून आला होता. तिने पतीला विचारले असता, पतीने गाडीतून बाहेर येऊन पत्नीला ढकलून दिले व तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून जाणारे वाहन चालक त्याला अडवत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पोलिस खात्याला गेल्या काही दिवसांपासून वाईट दिवस आले आहेत. हे खाते हल्ली नेहमीच चर्चेमध्ये असते. सिद्धी नाईक मृत्यू तपासकाम, पोलिसांची खंडणी वसुली व आजचे प्रकरण या विविध प्रकरणांमुळे पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.