Merces Court Incident Dainik Gomantak
गोवा

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

Goa POCSO Accused: मेरशी येथील न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी घेऊन पोक्सो आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मेरशी येथील न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी घेऊन पोक्सो आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी थेट दुसऱ्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

म्हापसा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या पोक्सो प्रकरणातील हा आरोपी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पोक्सो न्यायालयात या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात येणार होता. सुनावणीदरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले होते.

न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत कोलवाळ कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते आणि १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयीन कोठडीत घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपीने अचानक पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

तो थेट दुसऱ्या मजल्यावर पडल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला. न्यायालयीन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला गोमेकॉत हलविले. हा आरोपी सशर्त जामिनावर होता.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

न्यायालयीन कोठडीतील आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरून कशी काय उडी मारली? तेथे योग्य सुरक्षा रक्षक तैनात होते का? अशा विविध प्रश्नांमुळे न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

SCROLL FOR NEXT