Goa Mega Job Fair 2026 Dainik Gomantak
गोवा

Goa Mega Job Fair 2026: राज्यात 3,500 नोकऱ्यांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Goa government 3500 jobs recruitment mela: रविवार, १४ जून रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ‘मेगा जॉब फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील सुशिक्षित आणि कुशल तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या श्रम आणि रोजगार आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या विभागीय रोजगार विनिमय केंद्र पणजी यांच्या वतीने रविवार, १४ जून रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ‘मेगा जॉब फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते सायं. ५ वा. या वेळेत होणारा हा मेळावा राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यांपैकी एक असणार असून सुमारे ३,५०० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्याचा मानस आहे. या नोकरी मेळाव्याच्या उद्‌घाटनसमयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्यात राज्यातील तरुणाईने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोन्सेरात यांनी केले आहे.

या भव्य रोजगार मेळाव्याचे उद्देश राज्यातील तरुण जे नोकरीच्या शोधात आहेत आणि विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांना एकाच छताखाली आणणे हा आहे. यामुळे उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळेल, तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य मनुष्यबळ निवडणे सुलभ होणार आहे. गोव्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देखील हा उपक्रम अत्यंत पूरक ठरेल.

नामांकित कंपन्यांचा सहभाग

या मेळाव्यात फार्मा, विमान वाहतूक, हॉस्पिटॅलिटी (हॉटेल), ऑटोमोबाईल आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होत आहेत. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या सर्वच उमेदवारांसाठी येथे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांनी https://goajobfair.com या संकेतस्थळावर आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT