Goa Waterfalls: पावसाळी पर्यटनासाठी गोव्यातील 8 अफलातून ठिकाणे, नक्की भेट द्या!

दैनिक गोमन्तक डिजिटल

दुधसागर धबधबा

पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण वेगाने वाहतो. उंचावरून पडणारे पांढरेशुभ्र पाणी दुधासारखे दिसते, त्यामुळे याला 'दुधसागर' म्हणतात. ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी हे पावसाळ्यातील सर्वात मोठे आकर्षण आहे.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

तांबडी सुर्ला धबधबा आणि मंदिर

भगवान महावीर अभयारण्यात असलेले हे ठिकाण ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथील १२ व्या शतकातील कदंब कालीन महादेवाचे मंदिर आणि घनदाट जंगलातून जाणारा धबधब्याचा ट्रेक पावसाळ्यात अतिशय थरारक अनुभव देतो.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

चोरला घाट

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला चोरला घाट पावसाळ्यात धुक्याची चादर ओढून घेतो. येथील वळणावळणाचे रस्ते, दऱ्या आणि ठिकठिकाणी दिसणारे छोटे-मोठे धबधबे यामुळे हा घाट ड्रायव्हिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

हरवळे धबधबा आणि पांडव गुंफा

उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यात हा सुंदर धबधबा आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य अधिकच खुलते. या धबधब्या जवळच ऐतिहासिक हरवळे गुंफा (पांडव गुंफा) देखील आहेत, ज्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

म्हादई वन्यजीव अभयारण्य

पश्चिम घाटातील हे अभयारण्य पावसाळ्यात अत्यंत हिरवेगार आणि जिवंत होते. पक्षीप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांसाठी हे नंदनवन आहे. या दिवसांत निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंग करण्याचा आनंद येथे घेता येतो.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

केरी बेतुल किल्ला आणि समुद्रकिनारा

दक्षिण गोव्यातील हा ऐतिहासिक किल्ला एका उंच कड्यावर स्थित आहे. पावसाळ्यात येथून मिळणारा अरबी समुद्राचा विस्तीर्ण नजराणा आणि खाली आदळणाऱ्या लाटा पाहणे हा एक अद्भूत अनुभव असतो.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

खोतीगाव वन्यजीव अभयारण्य (Cotigao Wildlife Sanctuary)

उंचच उंच झाडे आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य गोव्याच्या दक्षिण भागात आहे. पावसाळ्यात येथील शांतता आणि निसर्गाचा गारवा मनाला एक वेगळीच अनुभूती देतो. येथील नेचर ट्रेल्स पर्यटकांना खूप आवडतात.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

दिवार बेट

मांडवी नदीत वसलेले हे शांत आणि सुंदर बेट धावपळीपासून दूर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. पावसाळ्यात येथील पोर्तुगीज शैलीतील घरे, शेतं आणि सभोवतालचे पाणी अतिशय नयनरम्य दिसते. येथे जाण्यासाठी फेरीची (Ferry) सेवा उपलब्ध आहे.

Goa Waterfalls | Dainik Gomantak

पती-पत्नीने चुकूनही करू नयेत या 7 गोष्टी!

Marriage Tips | Dainik Gomantak
आणखी बघा