GMC HIV Lab Gets National Recognition Dainik Gomantak
गोवा

गोवा मेडिकल कॉलेजच्या HIV लॅबला मिळाली राष्ट्रीय मान्यता

गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथील एचआयव्ही/एड्स निदान प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथील एचआयव्ही/एड्स निदान प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. देशभरातील प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचणीचे प्रमाणीकरण करणारी एजन्सी चाचणी आणि कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज (NABL) यांच्याकडुन ही मान्यता मिळाली आहे. (Goa Medical College's HIV Lab Gets National Recognition)

GMC च्या मायक्रोबायोलॉजी विभागामार्फत चालवले जाणारे आणि गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या पाठिंब्याने ही प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एचआयव्ही निदान आणि रोग निरीक्षणाची सेवा देते.

संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, “ही ICTC च्या प्राध्यापक आणि तांत्रिक कर्मचार्‍यांच्या सक्षमतेची एक ओळख आहे. ते या यशासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.” नियोजन आणि संबंधित मंजुरीची सुविधा GSACS द्वारे करण्यात आली होती तसेच संपूर्ण प्रक्रियेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने निधी आणि मार्गदर्शन केले होते. GMC च्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख, डॉ. मारिया जोस विझमन पिंटो यांनी प्रयोगशाळेसाठी NABL मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT