Goa Medical College Kerala student death Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'गोमेकॉ'च्या इंटर्न डॉक्टरचा दोनापावला बीचवर मृतदेह; प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती

Goa Medical College Kerala student death: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) प्रशिक्षण घेत असलेल्या केरळमधील एका २३ वर्षीय युवतीचा मंगळवारी सायंकाळी दोनपावला येथील हवाई बीचवर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) प्रशिक्षण घेत असलेल्या केरळमधील एका २३ वर्षीय युवतीचा मंगळवारी सायंकाळी दोनपावला येथील हवाई बीचवर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार, या मृत्यूचा संबंध भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाशी (अनेस्थेसिया) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांना या घटनेबाबत सायंकाळी ६.३० च्या सुमारास आपत्कालीन कॉल आला होता. घटनास्थळी पोहोचल्यानंतर हवाई किनाऱ्यावर मृतदेह आढळून आला. मृत युवती ‘गोमेकॉ’मध्ये इंटर्नशिप करत होती. अधिकृत दुजोरा मिळणे अद्याप बाकी असले तरी, प्राथमिक तपासात भूल देण्यासाठी वापरले जाणारे औषध मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे समोर येत आहे.

मात्र, पोलिसांनी इतर शक्यताही फेटाळलेल्या नाहीत आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. मृतदेह वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी ‘गोमेकॉ’च्या शवागारात पाठवला आहे. दरम्‍यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT