Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College Contract Workers: ‘गोमेकॉ’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरीत कायम करण्याची मागणी; 12 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्यांचे सरकारला निवेदन

GMC cardiology department staff protest: गेल्या बारा वर्षांपासून करार (कंत्राटी) पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवांचे नियमितीकरण करून नोकऱ्या कायम करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात गेल्या बारा वर्षांपासून करार (कंत्राटी) पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवांचे नियमितीकरण करून नोकऱ्या कायम करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त सचिवांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, २०१३ पासून ते हृदयविकार विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून रुग्णसेवा आणि विभागाचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक वर्षे सातत्याने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावूनही आजतागायत त्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळालेली नाही. करार पद्धतीवर असल्यामुळे नोकरीची शाश्वती, वेतनवाढ, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा तसेच नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर लाभ त्यांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दीर्घकाळ सेवा देऊनही कायमस्वरूपी सेवेत न घेणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाचा संदर्भ दिला आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये अनेक वर्षे अखंडपणे सेवा देणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन त्यांच्या सेवांचे नियमितीकरण करण्याबाबत विचार करावा, असे न्यायालयाने (Court) स्पष्ट केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारी यंत्रणांनी रोजगाराच्या बाबतीत न्याय्य धोरण अवलंबावे आणि दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांमध्ये आपण पात्र ठरत असल्याचा दावा करत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून आपल्या नोकऱ्या कायम कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT