CM Pramod Sawant, GMC Doctors Strike  Dainik Gomantak
गोवा

GMC Protest: मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई! कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य; व्हिडिओ, फोटोग्राफीवर बंदी

CM Pramod Sawant: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला.

डॉक्टरांच्या सातही मागण्या मान्य करून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. मात्र, आरोग्यमंत्र्यांकडून माफीचा मुद्दा अद्याप कायम असून, डॉक्टरांकडून ‘खोटी माफी मान्य नाही’ अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री गोमेकॉत दाखल झाले आणि डीन डॉ. शिवानंद बांदेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील, तसेच गार्ड संघटनेच्या सदस्यांसह बैठकीत सहभागी झाले. बैठकीनंतर प्रसार माध्यमांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी सोमवारी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते आणि आजही प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या सात प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.

गोमेकॉत व्हिडिओ व फोटोग्राफीवर बंदी, सुरक्षेसाठी पोलिस आऊट पोस्ट व ५० पोलिसांची नेमणूक, तसेच गैरप्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टरांनी आंदोलन न करण्याचे आश्वासन दिल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनीही ‘गार्ड’ कर्मचाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, सर्वांनी संयम राखून परिस्थिती हाताळली. आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वजण एकत्र काम करतील. डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले की, या विषयाबाबत कधी तरी मंत्र्यांची माफी अधिकृत मार्गाने मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रमुख मागण्या मान्य

गोमेकॉत व्हिडिओ-फोटोग्राफीवर बंदी

उपनिरीक्षकांसह ५० पोलिसांची नेमणूक

गैरप्रकार टाळण्यासाठी डॉक्टरांची समिती

डॉक्टर भूमिकेवर ठाम, माफीबाबत असमाधान

डॉक्टरांनी जरी आंदोलन मागे घेतले असले, तरी सर्वांचा सूर एकसंध नाही. मुख्यमंत्री असतानाच गोमेकॉ डीनच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका डॉक्टरने हातात फलक धरला होता, ज्यावर लिहिले होते ‘‘मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली आहे, यापेक्षा जास्त नाही, यापेक्षा कमी नाही. तुम्ही एका डॉक्टरला पटवून देऊ शकता; पण सर्व डॉक्टरांना बनावट माफी स्वीकारण्यास पटवून देऊ शकत नाही.’’

मंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमलाही प्रवेश बंदी

डिचोली येथील आरोग्य केंद्रात पत्रकारांना प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर, या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अधिकृत पत्रकारांना प्रवेश नाही. मग मंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमला व्हिडिओ आणि फोटो काढण्याची परवानगी आहे का, असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढे मंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमलाही आरोग्य केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT