Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: ग्रामपंचायत सचिव गुदिन्होंच्या निशाण्यावर; 'या' गोष्टी न केल्यास थेट निलंबन होणार

Mauvin Godinho: मध्यस्थीसाठी मंत्री,आमदारांनी पुढे येऊ नये

गोमन्तक डिजिटल टीम

Mauvin Godinho: राज्यातील ग्रामपंचायतींचे सचिव वेळेवर कामावर येत नाहीत. तपासणीच्या नावाखाली ते गायब होतात. याबाबत तक्रारी आपणाकडे आल्या आहेत.

त्यासाठी पंचायतींमध्ये बायोमेट्रिक बसविले जातील. दांड्या मारणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, त्यामुळे कोणत्याही सचिवाची शिफारस करण्यासाठी मंत्री व आमदारांनी येऊ नये, असे स्पष्ट करीत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी गुरुवारी सभागृहात सर्वांना बजावले.

आमदार प्रमेंद्र शेट यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्‍नावर मंत्री गुदिन्हो यांनी उत्तर दिले. माविन म्हणाले, सचिव वेळेवर कामावर जात नाहीत, हे लक्षात आलेले आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष पंचायतींना भेटी द्याव्यात.

सचिव कामावर वेळेत आला की नाही, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदली जाईल. पंचायत उपसंचालकांकडून आपणाकडे बीडीओंचा पंचायतींना भेटी दिल्याचा अहवाल पोहोचला पाहिजे, असा नियम केला जाईल.

दांड्या मारणारे, बेकायदा काम करणारे सचिव आढळल्यास व त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यास, निलंबित केल्यास, बदली केल्यास आपण शिफारस करण्यासाठी येऊ नये, असे बजावले.

सचिवाच्या निलंबनाचा आदेश:-
गुदिन्हो म्हणाले, आजच आपण एका सचिवाला निलंबनाचा आदेश जारी केला आहे. कारण शंभर टक्के बेकायदेशीर बांधकामावर बीडीओने कारवाई कर,असे सांगूनही ते कारवाई करीत नाहीत.

पंचायतींना कारवाईचे हक्क आहेत, पण ती कारवाई होत नाही. यापूर्वी सचिव -सरपंच यांची एकी असल्याने बीडीओ बाजूला होता, आता बीडीओ आणि सचिवांची एकी झाल्याने सरपंच बाजूला पडल्यासारखे चित्र आहे. ज्या ठिकाणी घर नंबर दिले आहेत, त्याठिकाणी आता बिल्डरलॉबीनेही प्रवेश केला आहे,असे माविन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT