Yuri Alemao |Goa News Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao Demand: खलाशांसाठी कायमस्वरूपी पेन्शन योजना लागू करावी

Yuri Alemao Demand: थकबाकी त्वरित द्यावी; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: ‘गोवा व्हीजन 2035 रोड मॅप’मध्ये खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन योजना लागू करण्याचे काँग्रेस पक्षाने वचन दिले होते. गोव्याच्या विकासासाठी खलाशांच्या योगदानाचा आदर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी खलाशांसाठी कायमस्वरूपी पेन्शन योजना अधिसूचित करावी आणि लाभधारकांना देय असलेली थकबाकी त्वरित द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

नाताळच्या काळात बहुतेक खलाशी गोव्यात परत येतात. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, त्यांनी कायमस्वरूपी पेन्शन योजना अधिसूचित करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावे आणि मागील दोन महिन्यांची प्रलंबित थकबाकीची रक्कम लाभधारक खलाशी व त्यांच्या विधवांच्या खात्यात जमा करावी, असे युरी आलेमाव म्हणाले.

खलाशी पेन्शन योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी सरकारने अर्जांची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. बहुतेक खलाशी आणि त्यांच्या विधवा यांना तंत्रज्ञानाची जाण नसल्याने अर्जासोबत लागणारी विविध कागदपत्रे सादर करण्यात त्यांना अडचणी येतात.

अर्ज सादर करणे, कागदपत्रे जोडणे इत्यादी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एनआरआय विभागाने गोव्यातील किनारी भागात शिबिरे आयोजित केली पाहिजेत. ज्यामुळे लाभार्थ्यांना मोठी मदत होईल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोवा सीमेनला मान्यता द्या

गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाला मान्यता द्यावी आणि त्यांना सरकारकडून साहाय्य तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावीत असे मी सरकारला आवाहन करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

अर्ज प्रक्रिया हवी सुलभ

खलाशी पेन्शन योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी सरकारने अर्जांची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुलभतेसाठी एनआरआय विभागाने गोव्यातील किनारी भागात शिबिरे आयोजित केली पाहिजेत.

गोव्याच्या विकासात खलाशांचे मोठे योगदान

खलाशी त्यांच्या मातृभूमीपासून मैलो दूर राहतात, परकीय चलन मिळवतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतात. गोव्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा वाटा आहे, गेल्या दोन महिन्यांची प्रलंबित थकबाकीची रक्कम लाभधारक खलाशी व त्यांच्या विधवांच्या खात्यात जमा करावी, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT